वैष्णवी हगवणेचे सासरे व दिराला तीन दिवसांची तर पती, सासू व नणंदेला एका दिवसाची पोलीस कोठडी
पुण्यातील मुळशी येथील वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येची सुनावणी आज शिवाजी नगर कोर्टात पार पडली. यावेळी वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना एका दिवसाची पोलीस कोठडी तर सासरे राजेंद्र व दीर सुशील यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आज शिवाजीनगर कोर्टात पार पडलेल्या सुनावणीच्या वेळी हगवणे कुटुबियांच्या वकिलाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावेळी हगवणेंच्या वकीलांनी वैष्णवी ही एका व्यक्तीसोबत चॅट करत असायची असे कोर्टात सांगितले.
राजेंद्र हगवणेला आसरा देणाऱ्या पाच जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यात मोहन उर्फ बंडू उत्तम भेगडे, बंडू फाटक, प्रीतम पाटील, प्रीतम पाटील, अमोल जाधव अशी त्या पाच जणांची नावे असून त्यांना 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List