Breaking- ठाणे, मुलुंड, भांडुप परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात, मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशीरा
मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरणामुळे दृश्यमानता कमी होती. त्यात आता दुपारनंतर उपनगरामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक सध्या 20 ते 25 मिनिटे उशीराने सुरु आहे. पश्चिम उपनगरातही जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूकही धीम्या गतीने सुरु आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगावमध्येही मुसळधार पाऊस कोसळत आहे.
सोसाट्याच्या वाऱ्यासह नवी मुंबई परीसरातही पावसाला सुरुवात झाली आहे. कल्याण, डोंबिवलीतही मुसळधार पावसाची सुरुवात झालेली आहे.
सविस्तर बातमी लवकरच…
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List