शाहरुख खान त्याच्या मुलांकडून ही गोष्ट शिकला? अभिनेत्याने कुटुंबाबद्दलचं हे खास सिक्रेट सर्वांशी केलं शेअर
बॉलीवूडचा किंग खान अर्थातच अभिनेता शाहरुख खान आज जगातील श्रीमंत व्यक्तिपैंकी एक आहे. त्याच्या कारकिर्दीत त्याने जे स्थान मिळवले आहे त्याला खरंचं कोणीच स्पर्धा करू शकत नाही. शाहरुखचे नाव आज संपूर्ण देशात आणि जगात प्रसिद्ध आहे. पण हे यश त्याला एका रात्रीत मिळालेले नाही तर त्याने ते अतिशय कठोर परिश्रम आणि कामाप्रती त्याचे समर्पण यामुळे तो आज यशाच्या त्या उंच शिखरावर आहे जिथे प्रत्येकाला पोहचण्याची इच्छा आहे.
शाहरुखलाही त्याच्या मुलांकडून खूप शिकायला मिळालं
शाहरुख खानचा अभिनयच लोकांना खूप आवडतो असं नाही तर त्याचे चाहत्यांशी असलेलं प्रेम, त्याची प्रत्येकाशी वागण्याची पद्धत यामुळे सर्वजण शाहरूख खानला किंग हार्टेडही म्हणतात. शाहरुखच्या अनेक चाहत्यांनीही या अभिनेत्याकडून खूप काही शिकलं आहे. शाहरुखच्या मुलांनाही त्याच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्याचं सांगितलं आहे. पण शाहरुखलाही त्याच्या मुलांकडून खूप काही शिकायला मिळाल्याचं त्याने एका मुलाखतीत सांगितलं आहे. एका संभाषणादरम्यान त्याने स्वतः हा खुलासा केला आहे.
शाहरूखसाठी कोणती गोष्ट प्रेरणादायी ठरली?
शाहरुखचे त्याच्या तिन्ही मुलांशी, मुलगी सुहाना खान आणि दोन्ही मुलगे आर्यन खान आणि अबराम खान यांच्याशी खूप खास नाते आहे. वडिलांपेक्षाही एक मैत्रीचे नाते आहे. शाहरूखला एका मुलाखतीत हा प्रश्न विचारण्यात आला होता की, “तुमच्या कुटुंबाकडून शिकलेल्या कोणत्या गोष्टी तुम्ही तुमच्या कामात वापरू शकता? आणि तुम्हाला सर्वात जास्त प्रेरणा देणारी गोष्ट कोणती आहे?”
कुटुंबाकडून ही गोष्ट शिकला शाहरूख
याला उत्तर देताना, शाहरूखने सांगितले की, तिघांही मुलांबद्दल बोलताना तो म्हणाला की तो त्याच्या मुलांकडून संयम बाळगायला शिकला आहे. शाहरुख म्हणाला, “तुम्हाला जितकी जास्त मुले असतात तितकाच जास्त संयम तुमच्यात येत असतो. मी माझ्या मुलांकडून संयम शिकलो. हाच संयम मला सकारात्मकता देतो”. अभिनेत्याने त्याची पत्नी गौरी खान आणि मुलांकडून जीवनातील संयमाचा गुण शिकल्याचं म्हटलं आहे. आणि हा गुण जीवनातील सर्वात कठीण परिस्थितीतही सर्वात महत्वाचा गुण असल्याचं त्याने म्हटलं.
लग्नानंतर शाहरुख आणि गौरीचे आयुष्य आई-बाब म्हणून कसे बदलले?
शाहरुखने त्याच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान असलेल्या गौरी खानसोबत प्रेमविवाह केला होता. दोघांनीही 1992 मध्ये लग्न केले. त्यानंतर या जोडप्याने मुलगा आर्यन खानचे स्वागत केले. 1997 मध्ये आर्यनच्या जन्मानंतर, 22 मे 2000 रोजी मुलगी सुहानाचा जन्म झाला. दोन मुले झाल्यानंतर, शाहरुख आणि गौरीने यांनी सरोगेसीद्वारा 2013 मध्ये सर्वात लहान मुलगा अबरामचं स्वागत केलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List