इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हमासचा नेता मोहम्मद सिनवारचा खात्मा, नेतन्याहू यांचा दावा

इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हमासचा नेता मोहम्मद सिनवारचा खात्मा, नेतन्याहू यांचा दावा

हमासचा गाझा युनिटचा प्रमुख मोहम्मद सिनवार याला इज्रायली सैन्याने ठार केले आहे, असा दावा इज्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केला. मोहम्मद सिनवार हा हमासचा माजी नेता याह्या सिनवार याचा धाकटा भाऊ होता, जो ऑक्टोबर 2024 मध्ये इज्रायली सैन्याच्या हल्ल्यात ठार झाला होता. गेल्या वर्षी याह्या सिनवारच्या मृत्यूनंतर मोहम्मद सिनवारला हमासच्या गाझा युनिटचा प्रमुख बनवण्यात आलं होतं.

इज्रायली सैन्याने 13 मे रोजी गाझामधील खान युनिस येथील युरोपियन रुग्णालयाखालील हमासच्या भूमिगत कमांड सेंटरवर जोरदार हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात मोहम्मद सिनवार आणि हमासच्या राफाह ब्रिगेडचा कमांडर मोहम्मद शबाना यांच्यासह अनेक दहशतवादी ठार झाल्याची माहिती, बेंजामिन नेतन्याहू यांनी जाहीर केली आहे. याआधी मे महिन्याच्या मध्यात इज्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल काटझ यांनी मोहम्मद सिनवारच्या मृत्यूची शक्यता व्यक्त केली होती, परंतु नेतन्याहू यांनी आता याला अधिकृत दुजोरा दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;