स्वतः च्या गाडीवर घडवून आणला गोळीबार, मिंधेंच्या पदाधिकार्‍याला अटक

स्वतः च्या गाडीवर घडवून आणला गोळीबार, मिंधेंच्या पदाधिकार्‍याला अटक

पोलीस संरक्षण आणि शस्त्र परवाना मिळविण्यासाठी स्वतः च्या गाडीवर गोळीबार घडवून आणण्याऱ्या मिंधेंच्या युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षाला वारजे पोलिसांनी अटक केली आहे. त्याने स्वतःच्या मोटारीवर गोळ्या झाडल्याचा कट रचल्याचे तपासातून उघडकीस आले आहे. ही घटना १९ मे रोजी बाराच्या सुमारास वारजे माळवाडी भागात घडली होती. निलेश राजेंद्र घारे असे अटक केलेल्या मिंध्येच्या जिल्हाध्यक्षाचे नाव आहे.याप्रकरणी सचिन गोळे, शुभम खेमणार आणि अजय उर्फ बगली सकपाळ यांनाही नुकतीच पोलिसांनी अटक केली होती. त्यांचा साथीदार संकेत मातले हा फरार असून वारजे पोलिसांकडून त्याचा शोध घेत आहेत.

पुणे जिल्हा युवासेना जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारे यांच्या वाहनावर अज्ञाताने १९ मे रोजी रात्री बाराच्या सुमारास वारजे माळवाडी भागात गोळीबार केला होता. घारे यांचे येथील गणपती माथा परिसरामध्ये जनसंपर्क कार्यालय असून, ते कार्यालयात सहकार्‍यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केला. सुदैवाने घारे हे गाडीत नसल्याने त्यांना दुखापत झाली नव्हती. याप्रकरणी वारजे पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथकांनी तपासाला गती दिली. रविवारी (दि. २५) रात्री उशिरा वारजे पोलिसांनी वारजे भागातून तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी हा सगळा प्रकार घडवून आणल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे निलेश घारे यांनीच गोळीबार करायला लावल्याचा धक्कादायक खुलासाही त्यांनी केला.

त्यानुसार कटाचा मुख्य सूत्रधार असल्याप्रकरणी पोलिसांनी जिल्हाध्यक्ष घारे याला अटक केली आहे. पोलीस संरक्षण मिळावे यासाठी त्यांनीच हा गोळीबार घडवून आणला आहे. स्वत: निलेश घारे यांनी स्वतःच्या गाडीवर गोळीबाराचा डाव रचल्याची माहिती पोलिस तपासातून उघडकीस आली आहे. पोलिस संरक्षण मिळावे आणि शस्त्र परवाना मिळावा यासाठी स्वतःच्या गाडीवर त्यांनीच गोळीबार घडवून आणला असल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती वारजे पोलिसांनी दिली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;