महादेव मुंडेंचे मारेकरी इतक्या महिन्यानंतरही मोकाट, तपासाला गती द्या; सुप्रिया सुळे यांची मागणी
परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येला अनेक महिने उलटूनही त्यांचे मारेकरी अद्यापही मोकाट आहेत. हत्याप्रकरणी तपासाला गती देऊन आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. X वर एक पोस्ट करत त्यांनी ही मागणी केली आहे.
X वर पोस्ट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येला अनेक महिने उलटून गेले. परंतु अद्यापही मारेकरी मोकाट आहेत. याबाबत गृहखात्याकडून कसलीही हालचाल होताना दिसत नाही.”
त्या म्हणाल्या की, “पिडीत कुटुंबीयांनी यासाठी आंदोलन देखील केले. ते सातत्याने राज्य सरकारकडे न्याय मागत आहेत परंतु त्यांची दुर्दैवाने दखल घेतली जात नाही. ही अतिशय खेदजनक व गंभीर बाब आहे. यासंदर्भात माझी पोलीस अधीक्षक, बीड यांना नम्र विनंती आहे की कृपया आपण महादेव मुंडे यांच्या हत्याप्रकरणी तपासाला गती देण्याबाबत आवश्यक ती पावले उचलावी आणि या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List