लक्ष्मीकांत बेर्डे यांची शेवटच्या क्षणी कशी होती प्रकृती? प्रसिद्ध अभिनेते म्हणाले, ‘त्याने स्वतःने…’

लक्ष्मीकांत बेर्डे यांची शेवटच्या क्षणी कशी होती प्रकृती? प्रसिद्ध अभिनेते म्हणाले, ‘त्याने स्वतःने…’

Laxmikant Berde: दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनाला आज अनेक वर्ष झाली आहे. पण त्यांच्या आठवणी आजही चाहत्यांच्या आणि अनेक सेलिब्रिटींच्या मनात कायम आहेत. अनेक सिनेमांमध्ये विनोदी भूमिका साकारत लक्ष्मीकांत बेर्डे यांनी चाहत्यांना पोट धरून हसवलं. पण नंतर मात्र चाहत्यांना रडवून गेले. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘झपाटलेला’, ‘धडाकेबाज’, ‘अफलातून’, ‘हमाल दे धमाल’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘हम साथ साथ है’ अशा अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

आजही फक्त चाहतेच नाही तर, अनेक सेलिब्रिटी देखील लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण काढतात. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत ज्येष्ठ अभिनेते चेतन दळवी यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण सांगितली आहे. सध्या सर्वत्र चेतन दळवी यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत सांगितलेल्या आठवणीची चर्चा रंगली आहे.

मुलाखतीत चेतन दळवी यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दलची भावुक आठवण सांगितली. ‘लक्ष्मीकांत बेर्डे सोबत कोणतीही भूमिका असो मी करायला तयार आहे. लक्ष्या जायच्या आधी मी त्याला भेटायला गेलो. त्याला विचारलं काय रे कसा आहेस…? तेव्हा म्हणाला नंतर बोलतो मी. नंतर म्हणाला ‘तुम्ही दोघेच माझे आहात..’ तेव्हा लक्ष्याने माझं आणि विजय चव्हाण यांचं नाव घेतलं. ‘दोघांशिवाय माझं कोणीच नाही…’ यावर त्याला म्हणालो ‘वेडा आहेस काय? आधी सांगायचं ना आम्हाला काय होतंय ते. त्याने स्वतःचे प्रचंड हाल करुन घेतले…’ असं देखील चेतन दळवी फिल्मी मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

सांगायचं झालं तर, लक्ष्मीकांत बेर्डे यांनी फार लवकर चाहत्यांचा आणि सिनेविश्वाचा निरोप घेतला. पण कलाकाराचा कधीच अंत होत नाही… असं म्हणतात ते अगदी खरं आहे. लक्ष्मीकांत बेर्डे आजही सिनेमे आणि काही व्हिडीओंच्या माध्यमातून चाहत्यांमध्ये आहे. एवढंच नाही तर, लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सिनेमे चाहते तितक्यात आवडीने आणि उत्सुकतेने पाहतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;