Sperm Quantity : होय, तीच वाईट सवय, ज्यामुळे बाबा होण्याच्या तुमच्या स्वप्नावर पाणी! शुक्राणू वाढतच नाहीत, तुम्हाला असेल तर सोडा लागलीच
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आई-वडील होण्याचे स्वप्न दुरापास्त होत आहे. अथवा त्यासाठी महागड्या उपचारांचा मोठा खर्च करावा लागत आहे. नवीन तंत्रज्ञान आले असले तरी त्यासाठी अधिक खर्च करावा लागतो. पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या कमी होणे आणि त्यात गुणवत्ता नसणे ही समस्या वाढली आहे. एका वाईट सवयीमुळे ही समस्या उद्भवत असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. कोणती आहे पुरुषांची ती वाईट सवय, ज्यामुळे त्यांचे एक मोठे स्वप्न भंग होऊ शकते?
मोबाईलचा अतिरेकी वापर
सध्या मोबाईल ही अन्न, वस्त्र, निवारा, इंटरनेटसारखीच गरज ठरली आहे. आता जवळपास सर्वच महत्त्वाची कामे मोबाईलवर होतात इंटरनेट आणि नेटवर्क असेल तर तुम्ही जगाशी जोडल्या जाता. आता तर नेटवर्क 6G च्या स्पीडने धावणार आहे. हँडसेट सुद्धा अत्याधुनिक झाले आहेत.
काही जण कामासाठी मोबाईलवर व्यग्र असतात. तर काही जण मोबाईलवर टाईमापस करतात. गेम खेळणे, रील्स पाहणे, युट्युबवर नाहक व्हिडिओ चाळणे, फेसबूक, इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पाहण्यात त्यांचा मोठा वेळ जातो. एका संशोधनानुसार मोबाईल फोन पुरुषांमध्ये वंध्यत्वाचे कारण ठरत आहे. मोबाईलचा अतिरेकी वापर पुरुषांमधील शुक्राणूंच्या संख्येवर परिणाम करत आहे. गुणवत्तेवर परिणाम दिसून येत आहे.
काय आहे तो अहवाल?
दक्षिण कोरियाच्या संशोधकांनी 4,280 शुक्राणूचे ( Sperm) नमुने घेऊन 18 अहवाल नावाने त्याचे विश्लेषण केले आहे. मोबाईलमधील विद्यूत चुंबकीय लहरी (Electromagnetic Waves) शुक्राणूंना नुकसानदायक ठरत आहेत. त्यामुळे पुरुषांनी मोबाईलचा अतिरेकी वापर थांबवण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
शेफिल्ड महाविद्यालयाचे अँड्रोलॉजीचे प्राध्यापक आणि शुक्राणू तज्ज्ञ एलन पेसी यांनी या संशोधनावर प्रश्न उपस्थित केला आहे. मोबाईलच्या वापरामुळे शुक्राणूची संख्या कमी आणि गुणवत्ता कमी होते, हे आजून सिद्ध व्हायचे असल्याचे ते म्हणाले. गेल्या दहा वर्षांपासून यासंबंधी संशोधन सुरू आहे. पण त्यातून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा दावा त्यांनी केला.
तर दुसरीकडे पुसान विद्यापीठाचे मुख्य संशोधक डॉ. यून हाक किम यांनी मात्र या अहवालाला अंशतः दुजोरा दिला आहे. त्यांच्या मते, शुक्राणूंची गुणवत्ता आणि संख्या कमी होण्यामागे विद्युत चंबकीय लहरींचे प्रमाण कारणीभूत असू शकते. त्यावर अजून संशोधन होण्याची गरज आहे. पण मोबाईलचा अतिरेक वापर मानवासाठी घातक असल्याचे ते म्हणाले.
तर काही तज्ज्ञांच्या मते, वाढते वय, कामाचा ताण, धावपळ, पुरेशी झोप न होणे यासह इतर कारणांमुळे शुक्राणूंच्या वाढीवर परिणाम होतो. त्यांची संख्या कमी होते. त्यामुळे या धकाधकीच्या वेळापत्रकात पुरूषांनी योगा, प्राणायाम, व्यायाम, योग आहार याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तर त्यांचे शुक्राणू वाढतील आणि त्यांची गुणवत्ता पण चांगली असेल. त्यामुळे सदृढ बाळ जन्माला येईल.
डिस्क्लेमर : इंटरनेटवरील स्त्रोताच्या माहितीआधारे हा लेख आहे. त्यात काही तज्ज्ञांची मते आहेत. या माहितीला टीव्ही ९ मराठी दुजोरा देत नाही. तुमच्या आरोग्याविषयक तक्रारींसाठी तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List