Hair Care- केस धुतल्यानंतर तुम्हीसुद्धा ही चूक करताय? मग आजच थांबा

Hair Care- केस धुतल्यानंतर तुम्हीसुद्धा ही चूक करताय? मग आजच थांबा

केसगळतीची समस्या ही आजकाल अनेकांना भेडसावत असते. सध्याच्या घडीला मात्र केसगळतीच्या समस्येने पुरुष आणि स्त्रिया त्रस्त आहेत. केस धुण्यासाठी आपण वापरत असलेले शॅम्पो, साबण या अनेक गोष्टी केसगळतीसाठी कारणीभूत आहेत. केवळ इतकेच नाही तर आपण केस सुकवण्यासाठी वापरत असलेले हेअर ड्रायरही केसगळतीसाठी कारणीभूत आहे. केस धुतल्यानंतर सुकवण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे नैसर्गिकरीत्या मिळणारे ऊन. पण प्रत्येकवेळी आपल्याला ऊन मिळेलच असे नाही. अशावेळी आपण केस सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर करतो. तुम्ही हेअर ड्रायर नियमितपणे वापरत असाल तर तुम्हाला त्याचे तोटे आणि खबरदारी जाणून घेणे आवश्यक आहे.

Hair Care- केस घनदाट, मऊ मुलायम होण्यासाठी खोबरेल तेलात आठवडाभर ही वस्तू केसांना लावा! केस होतील सिल्की शायनी.. वाचा, सविस्तर

केसांना हेअरड्रायर वापरण्याचे तोटे

हेअर ड्रायर वापरण्यापूर्वी केसांना सिरम लावा, जेणेकरून ड्रायरच्या उष्णतेमुळे केसांचे जास्त नुकसान होणार नाही आणि केस मऊ होऊ शकतात.

 

तुमच्या केसांच्या प्रकारानुसार हेअर ड्रायर वापरणे चांगले. केस कुरळे, कोरडे, मऊ किंवा रेशमी आहेत की नाही यावर अवलंबून, आपल्याला तापमान किती लागेल हे लक्षात घ्यायला हवे.

हेअर ड्रायरच्या अतिरिक्त वापरामुळे अनेकांमध्ये केस सफेद होण्याचे प्रमाणही खूप वाढलेले आहे. अतिरिक्त वापरामुळे केसांखालील त्वचा कोरडी होते त्यामुळे केस तुटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते.

 

हेअर ड्रायरचा वापर हा डोळसपणे करायला हवा. उगाच अतिरिक्त वापर करून केसांना हानी पोहचण्यापेक्षा थोडा डोळसपणे हेअर ड्रायरचा वापर करा.

 

नवीन हेअरस्टाइल देण्यासाठी हेअर ड्रायरचाही वापर केला जातो. पण त्याचे तोटेही लवकरच दिसू शकतात.

 

हेअर ड्रायरच्या अतिवापराने केसांचे नैसर्गिक सौंदर्य हिरावून घेतले जाऊ शकते. दुसरीकडे रोजच्या वापरामुळे केसांमध्ये कोंडा, क्लेमेंट, निस्तेज आणि कोरडेपणा यासारख्या समस्या वाढू शकतात आणि केस कोरडे आणि निर्जीव होऊन तुटायला लागतात.

हेअर ड्रायर मुळे केसांच्या मुळांना इजा होते, तसेच डबल केस फुटण्यास सुरुवात होते.

 

हेअर ड्रायर वापरताना लक्षात ठेवा की, केसांपासून त्याचे अंतर 6-9 इंच असावे. अन्यथा, केसांमधील कोरडेपणा वाढेल आणि ते लवकर तुटण्यास सुरवात होतील.

Hair Care-अंघोळीआधी फक्त दहा मिनिटे केसांना दही लावून ठेवा; केस होतील मऊ मुलायम, चमकदार! वाचा सविस्तर

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘ठाकरे अन् पवारांचे सहा दशकांचे प्रेम’, राज-उद्धवबाबत काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? ‘ठाकरे अन् पवारांचे सहा दशकांचे प्रेम’, राज-उद्धवबाबत काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला....
WAVES फक्त समिट नाही, तर ती एक लाट आहे; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गौरवोद्गार
“माणसांना रोबॉट नाही बनवायचंय, मोठी स्वप्न पाहा”; मोदींचं तरुण क्रिएटर्ससाठी काय आवाहन?
आपल्या यंग टॅलंटला मानवताविरोधी विचारांपासून वाचवलं पाहिजे; मोदींचं आवाहन
“क्रिएट इन इंडिया, क्रिएट फॉर द वर्ल्ड…” पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुंबईतून नवी घोषणा
भगवान शंकराचे डमरु, श्रीकृष्णची बासरी, विष्णूचा शंख ध्वनी सकारात्मक ऊर्जा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितली भारतीय संगीताची परंपरा
Mukesh Ambani: अंबानी कुटुंबातील Happy डॉगचा मृत्यू, व्हायरल होतेय भावूक पोस्ट