IPL 2025 – पंजाब किंग्जच्या सुसाट गाडीला ब्रेक लागणार? महत्त्वाचा खेळाडू स्पर्धेतून बाहेर
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाब किंग्जचा (PBKS) यंदाचा हंगाम अद्याप तरी दमदार राहिला आहे. संघाने 10 सामन्यांमध्ये 6 सामने आपल्या नावावर केले असून फक्त 3 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. तर कोलकाताविरुद्धचा एक सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. पंजाब गुणतालिकेत सध्या 13 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाबची गाडी सध्या प्ले ऑफच्या दिशेने सुसाट मार्गस्थ झाली आहे. याच दरम्यान संघाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल संघाची साथ सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पंजाब किंग्सने सोशल मीडियावर (X) पोस्ट करत ग्लेन मॅक्सवस आयपीएलमधून बाहेर होत असल्याचे सांगितलं आहे. बोटाला झालेल्या दुखापतीमुळे मॅक्सवेल आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. परंतु मॅक्सवेलच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी मिळणार, हे सुद्धा सांगण्यात आलेलं नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये मॅक्सवेलचा खेळ सर्व साधारण राहिला होता. त्याने 6 डावांमध्ये 8 च्या सरासरीने फक्त 48 धावा केल्या आहेत. तसेच 27.5 सरासरीने चार विकेट घेतल्या आहेत. मॅक्सवेलला पंजाबने 4.2 कोटी रुपयांना खरेदी केले होते.
IPL 2025 – लय गवसलेल्या MI ला मोठा धक्का; पदार्पणाचा सामना गाजवणारा खेळाडू स्पर्धेतून बाहेर
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List