अक्षय्य तृतीयेच्या दिवशी राज्य सरकारने 29 बालविवाह रोखले, महिला व बालकल्याण विभागाची माहिती

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी राज्य सरकारने 29 बालविवाह रोखले, महिला व बालकल्याण विभागाची माहिती

अक्षय तृतीयाचा मुहुर्त साधून राज्यात अनेक ठिकाणी बालविवाह होणार होते. पण राज्य सरकारने वेळीच हस्तक्षेप करून हे विवाह रोखले आहे. महिला व बालविकास विभागाने राज्यातील 29 बालविवाह रोखले आहेत.महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. या दिवशी अनेक मुहुर्त असतात त्यामुळे बालविवाह होतील ते रोखा असे आदेश त्यांनी दिले होते.

अक्षय तृतीयाच्या दिवशी महिला व बालविकास विभागाने 16 जिल्ह्यातले 29 बालविवाह रोखले आहेत. यातील 11 विवाह हे मराठवाड्यात, 9 विदर्भातून तर दोन उत्तर महाराष्ट्र आणि दोन पश्चिम महाराष्ट्रात होणार होते.

आम्हाला महाराष्ट्र बालविवाहमुक्त करायचा आहे, त्यामुळे संपूर्ण राज्यातील आमचे अधिकारी आणि कर्मचारी बुधवारी अलर्ट मोडवर असतात असे बोर्डीकर म्हणाल्या. या कारवाईमुळे संपूर्ण राज्यात बालविवाह लावणाऱ्यांना संदेश मिळेल असेही बोर्डीकर म्हणाल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;