मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची ताब्यात अचानक बिघडलेली आहे. त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना डॉक्टरांनी सांगितलं की, मनोज जरांगे याला पर्वापासूनच त्रास होत आहे. अंगदुखी, अशक्तपणा आणि थकवा जाणवत आहे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. दोन वर्षांपासून सरकारच्या निर्णयाची वाट पाहत आहे. पण आता संयम नाही. सरकारने कोणत्याही मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत. मुंबईत गेल्याशिवाय मराठा समाजाला न्याय मिळणार नाही, त्यामुळे ‘चलो मुंबई’ असा नारा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या तर ठीक, नाहीतर 29 ऑगस्टपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याचे या वेळी त्यांनी जाहीर केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List