विरोधी पक्षाच्या दबावामुळे जातनिहाय जनगणनेचा निर्णय, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्याकडून केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत
विरोधी पक्षाच्या दबावामुळे केंद्र सरकारला जातनिहाय जनगणना करावी लागली अशी टीका तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी केली. तसेच तेलंगणा सरकारने आधी हा निर्णय घेतला आणि ओबीसींचे सशक्तिकरणासाठी देशाला प्रेरणा मिळाली असेही रेड्डी म्हणाले.
मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी म्हणाले की विरोधी पक्षांच्या दबावामुळे केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला. यावर आम्ही राजकारण करणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. जर सरकारला खरंच जातीनिहाय जनगणना करायची असेल तर सरकारने आधी केंद्रीय मंत्र्यांची आणि तज्ज्ञांची एक समिती नेमावी.
तसेच तेलंगाणात काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यावर आम्ही जातनिहाय जनगणना करून दाखवली. त्यानंतर केंद्र सरकारनेही जातनिहाय जनगणना करावी असा प्रस्ताव आम्ही विधानसभेत मंजूर केला. जर सरकारने ही जनगणना केली नाही तर देशाने कधीच भाजपला माफ केलं नसतं असेही रेड्डी म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List