इस्रायलच्या जंगलात भीषण आग, देशात आणीबाणी जाहीर
इस्रायलमधील जंगलात भीषण आग लागली आहे. या आगमीमुळे शहराला तेल अवीवशी जोडणारा महामार्ग बंद करण्यात आला आहे. परिस्थिती बिकट होत असल्याचे पाहून इस्रायल सरकारने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. या भीषण आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी इटली, क्रोएशिया, स्पेन, फ्रान्स आणि रोमानियासह अनेक देशांनी मदत पाठवली आहे. या मदतीमध्ये आग विझविण्यासाठी विमानातून पाणी आणि रसायने टाकणे देखील समाविष्ट आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी इस्रायली जंगलात ही आग लागली. अति उष्णतेमुळे लागलेली ही आग जोरदार वाऱ्यामुळे भडकली आणि काही तासांतच अनेक चौरस मैलांवर पसरली. आग पसरत असल्याचे पाहून जंगलाच्या काठावर असलेल्या वस्त्यांमध्ये राहणारे हजारो लोक जीव वाचवण्यासाठी इतर ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. दरम्यान, आगीवर नियंत्र मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List