Pahalgam Attack Update – बंदी घातलेल्या हुर्रियतच्या संघटनांकडून दहशतवाद्यांना मदत? NIA चे कश्मीरमध्ये छापे
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तपास यंत्रणा अॅक्शन मोडवर आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेकडून (NIA) हल्ल्याचा सर्व अंगांनी तपास करण्यात येत आहे. याच तपासात NIA ने कश्मीरमध्ये हुर्रियतच्या अनेक गटांवर आणि जमात-ए-इस्लामीच्या समर्थकांच्या ठिकाणांवर आज छापे टाकले. आतापर्यंतच्या तपासात देश विरोधी अनेक वस्तू NIA च्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बंदी घातलेल्या या फुटीरतावादी संघटनांनी पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांचे नेटवर्क उभारण्यात रसद पुरवल्याचा संशय NIA ला आहे. ज्यांच्यावर छापे टाकण्यात आले आहेत त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात येत आहेत. फुटीरतावादी बंदी घातेलल्या या संघटनांचे काहीजण मदत करणाऱ्यांच्या सतत संपर्कात होते, असा दावा NIA च्या सूत्रांनी केला आहे.
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी तीन ठिकाणी केली होती रेकी, धक्कादायक माहिती आली समोर
हल्लेखोर दहशतवादी 15 एप्रिल रोजीच पहलगाममध्ये पोहोचले होते. या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांकडून एनआयएला मोठी माहिती मिळाली आहे. पहलगामसह आणखी तीन ठिकाणे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होती, असे एनआयएच्या तपासातून समोर आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. दहशतवादी हल्ल्यापूर्वी खोऱ्यात तीन सॅटेलाइट फोन वापरल्याची माहिती आहे.
एनआयएच्या तपासात आतापर्यंत दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या जवळपास 20 जणांची (ओजीडब्ल्यू) ओळख पटली आहे. त्यापैकी अनेकांना अटक करण्यात आली आहे. यातील 4 जणांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांना रेकी करण्यात मदत केली होती. हल्ल्यादरम्यान वापरले गेलेल्या तीनपैकी दोन सॅटेलाईट फोनचे सिग्नल तपास यंत्रणांनी शोधले आहेत. 2500 संशयितांपैकी 186 जण अजूनही ताब्यात आहेत आणि त्यांची चौकशी सुरू आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List