ठरलं! ‘या’ मैदानावर रंगणार फायनलचा थरार, ICC ने केली मोठी घोषणा

ठरलं! ‘या’ मैदानावर रंगणार फायनलचा थरार, ICC ने केली मोठी घोषणा

ICC महिला टी-20 वर्ल्ड कप पुढच्या वर्षी इंग्लंडमध्ये होणार आहे. तशी घोषणा आयसीसीने यापूर्वीच केली होती. परंतु फायनलचा थरार कोणत्या स्टेडियमवर रंगणार हे निश्चित नव्हते. परंतु, आता ICC ने घोषणा करत फायनलचा सामना क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर रंगणार असल्याचे घोषित केलं आहे.

ICC महिला टी-20 वर्ल्ड कप 2026 हा इंग्लंडमध्ये होणार आहे. काही ठिकाणांची त्यासाठी निवड करण्यात आली आहे. ओल्ड ट्रॅफर्ड, हेडिंग्ले, एजबॅस्टन, हॅम्पशायर बाउल, द ओव्हल, ब्रिस्टर काउंटी आणि लॉर्ड्स या स्टेडियमवर वर्ल्ड कपचे सामने खेळले जाणार आहेत. 15 जून 2026 ते 5 जूलै 2026 दरम्यान रंगणाऱ्या या वर्ल्ड कपमध्ये एकून 12 संघ आपलं नशीब आजमावणार आहेत. दोन गटांमध्ये संघांची विभागणी करण्यात येणार असून साखळी फेरीत 20 सामने खेळले जाणार आहेत. हिंदुस्थान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि श्रीलंका हे 8 संघ वर्ल्ड कप खेळण्यासाठी पात्र ठरले आहेत. परंतु उर्वरित 4 संघ कोणते हे अद्याप निश्चित झालेलं नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;