‘WAVES 2025… क्रिएटिव कॉन्टेंटचे लॉन्चिंग पॅड बनतंय…’ सुपरस्टार अल्लू अर्जुनकडून गौरव
मुंबईत आजपासून वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (WAVES) ला सुरुवात झाली आहे. चार दिवस चालणाऱ्या या समिटमध्ये अनेक बडे कलाकार सहभागी होत आहेत आणि विविध विषयांवर आपली मते मांडत आहेत. समिटच्या पहिल्याच दिवशी पॅन इंडिया सुपरस्टार अल्लू अर्जुन सहभागी झाला. TV9 चे CEO/MD बरुण दास यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
अल्लू अर्जुनने ‘सीमांपल्याडची प्रतिभा’ (Talent Beyond Borders) या विषयावर आपले विचार मांडले. आता त्यांना त्यांच्या भागापुरतेच नव्हे, तर संपूर्ण देशात ओळखलं जातं, असं अल्लू अर्जुन म्हणाला. जेव्हा ‘पुष्पा 2’ च्या रिलीजनंतर त्यांच्या आयुष्यात काय बदल झाला आहे? असा सवाल त्याला करण्यात आला. त्यावर त्याने उत्तर देण्याआधी भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे WAVES समिट आयोजित केल्याबद्दल आभार मानले.
अल्लू अर्जुनच्या आयुष्यात किती बदल झाला?
‘पुष्पा’ नंतर आयुष्यात झालेल्या बदलांविषयी ते म्हणाले, “आता प्रत्येकजण माझा चेहरा ओळखतो. मी एक प्रादेशिक अभिनेता होतो, पण ‘पुष्पा’ मुळे आता सगळेच मला ओळखतात.” WAVES समिटबाबतही त्यांनी मोठं वक्तव्य केलं. तो म्हणाला, “माझ्या मते WAVES हा भारतासाठी क्रिएटिव्ह कंटेंटमध्ये जागतिक नेतृत्व करण्याचा एक लाँचिंग पॅड ठरत आहे.”

allu arjun
डान्सिंग स्किलबाबत…
अल्लू अर्जुनने त्याच्या डान्सिंग कौशल्याविषयीही सांगितलं. तो म्हणाला की, तो लहानपणापासून डान्स करतोय आणि त्याने डान्सचं कधीही औपचारिक ट्रेनिंग घेतलेलं नाही. तो एक नैसर्गिक डान्सर आहे, पण आता आपले कौशल्य अजून सुधारण्यासाठी प्रशिक्षण घेत आहेत.
‘पुष्पा 2’ ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास
डिसेंबर 2024 मध्ये अल्लू अर्जुन ‘पुष्पा 2’ घेऊन आले होते. पहिल्या भागासारखंच या चित्रपटात रश्मिका मंदानाही होती. पुष्पाचा ‘फायर’ अंदाज प्रेक्षकांना प्रचंड आवडला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करत 1850 कोटींहून अधिकची कमाई केली. ही आमिर खानच्या ‘दंगल’नंतर भारतीय सिनेमाची दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक कमाई करणारी फिल्म ठरली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List