IPL 2025 – चेपॉकवर पंजाबच ‘किंग’, थाटात सामना जिंकला; पण BCCI नं चूक पकडली अन् श्रेयस अय्यरला भूर्दंड बसला
इंडियन प्रीमियर लीगमध्ये बुधवारी दोन किंग्ज आमनेसामने आले होते. चेपॉकवर चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्जमध्ये सामना रंगला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या लढतीत पंजाबने 4 विकेट्सने विजय मिळवला आणि चेन्नईने यंदाच्या हंगामातून गाशा गुंडाळला. पंजाबचा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहल याने हॅटट्रिक घेतली, तर कर्णधार श्रेयस अय्यर याने 72 धावांची मॅचविनिंग खेळी केली. मात्र या लढतीत अय्यरकडून एक चूक झाली आणि याचा फटका त्याला बसला.
पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर याला स्लो ओव्हर रेटमुळे बीसीसीआयने दंड ठोठावला आहे. यंदाच्या हंगामातील अय्यरची ही पहिलीच चूक असल्याने आयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम 2.2 अंतर्गत 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
आयपीएलच्या आचारसंहितेनुसार एखाद्या संघाने पहिल्यांदा स्लो ओव्हर रेटचा अपराध केल्यास या संघाच्या कर्णधाराला 12 लाखांचा दंड होतो. दुसऱ्यांदा ही चूक झाल्यास 24 लाखांचा दंड होतो, तर तिसऱ्यांदा ही चूक केल्यास डीमेरिट गुण दिला जाईल. याआधी तिसऱ्यांदा अशी चूक झाल्यास कर्णधारावर एका सामन्याची बंदी घालण्यात येत होती, मात्र यंदाच्या हंगामात बीसीसीआयने या नियमात बदल केला आहे.
तू चॅम्पियन; पण आता थांब, गिलख्रिस्टचा धोनीला प्रेमाचा सल्ला
चेपॉकवर झालेल्या लढतीत चेन्नईचा संघ प्रथम फलंदाजी करताना 190 धावांमध्ये गारद झाला. पंजाबचा फिरकीपटू युझवेंद्र चहल याने 19 व्या षटकामध्ये हॅटट्रिकसह चार विकेट्स घेतल्या. त्यानंतर 191 धावांचे आव्हान पंजाबने श्रेयस अय्यरच्या 72, प्रभसिमरन सिंगच्या 54 धावांच्या बळावर 2 चेंडू बाकी असताना 6 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. दरम्यान, या विजयानंतर पंजाबचा संघ गुणतालिकेत 13 गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
Hat-trick
Powerful start with the bat
Captain’s knockThe Battle of Kings goes the @PunjabKingsIPL way again this season
Scorecard
https://t.co/eXWTTv7Xhd #TATAIPL | #CSKvPBKS pic.twitter.com/Yk1SOZOzip
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2025
दरम्यान, मला कोणत्याही मैदानावर धावांचा पाठलाग करायला आवडते. जेव्हा विजयासाठी मोठे आव्हान असते तेव्हा तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागते आणि गतीने खेळावे लागते. जेणेकरून इतर फलंदाजही मैदानात उतरून आपल्या पूर्ण क्षमतेने खेळू शकतीत. असे होते तेव्हा मला बरे वाटते, असे अय्यर सामना संपल्यानंतर म्हणाला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List