Ratnagiri News – ‘टॉवर लावलाय नावाला अन् रेंज नाही गावाला’, BSNL च्या भोंगळ कारभाराने गावकरी त्रस्त
दापोली तालुक्यातील ओणनवसे गावात बीएसएनएल कंपनीने 6 महिन्यांपूर्वी मोबाईल टॉवर उभा केला होता. मात्र अद्यापही उभारलेला टॉवर सुरू करण्यात आलेला नाही त्यामुळे “टॉवर लावलाय नावाला अन् रेंज नाही गावाला” अशी अवस्था ओणनवसे गावासह परिसरातील गावांमधील मोबाईल धारकांची झाली आहे.
सद्यस्थितीत मोबाईला वापर खुपच वाढला आहे. मात्र अजूनही ग्रामीण भागांमध्ये नेटवर्क मिळत नसल्याने संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत. नेटवर्क अभावी ऑनलाईन कामांवर त्याचा खुपच मोठा परिणाम होत आहे. त्याचबरोबर परगावी किंवा मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये राहत असलेल्या नातेवाईकांना एमरजन्सी फोन करताना बऱ्याच अडचणींचा सामना लोकांना करावा लागत आहे.
ओणनवसे परिसरातील नागरिकांनी मोबाईल टॉवरची मागणी कित्येक वर्षे सबंधित आस्थापनेकडे लावून धरली होती. त्याला वर्षभरापूर्वी यश आले. आणि दापोली तालुक्यातील ओणनवसे येथे BSNL चा टॉवर उभा राहिला लोकांनी समाधान व्यक्त केले. मात्र मागील 6 महिन्यापूर्वीच उभारण्यात आलेला टाॅवर अजूनही सुरू करण्यात आलेला नाही. टॉवर सुरू करा अशाप्रकारची विनंती सातत्याने बीएसएनएल कंपनी च्या अधिकाऱ्यांकडे करण्यात येत असली तरीस येथील बीएसएनएल च्या संबंधित अधिकाऱ्यायाला धड मराठी भाषा समजत नसल्याने, तो काय बोलतो आणि लोकांची मागणी काय आहे तेच मुळी त्या अधिकाऱ्याला समजत नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List