राजस्थानमध्ये एका हॉटेलमध्ये भीषण आग, चार जणांचा होरपळून मृत्यू
राजस्थानच्या अजमेरमध्ये एका हॉटेलमध्ये भीषण आग लागली आहे. या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण हे हॉटेल एका गल्लीत असल्याने बचावकार्य करताना अडचणी येत आहेत. अजूनही हॉटेलमध्ये लोक अडकले असून बचावकार्य सुरू आहे.
सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढेल अशी भिती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या हॉटेलला आग लागली ते हॉटेल पाच मजल्यांचे आहे. सकाळी हॉटेलमध्ये आगीच्या ज्वाळा दिसल्या आणि लोकांची एकच धावपळ सुरू झाली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले, पण त्यापूर्वीच संपूर्ण हॉटेलला आगल लागली होती. ही आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्याप कळालेले नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List