अटारी सीमेवर पाकिस्तानचा खोडसाळपणा, गेट न उघडल्याने दोन्ही बाजूंनी लोक अडकले
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये तणाव सुरु आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थान सरकारने पाकिस्तानी नागरिकांना अटारी सीमेवरून परतण्याची परवानगी दिली आहे. मात्र अटारी सीमेवर सकाळपासून पाकिस्तानने दरवाजेच उघडलेले नाहीत. पाकिस्तान आपल्या नागरिकांनाही परत घेत नाही आणि पाकिस्तानात अडकलेल्या हिंदुस्थानी नागरिकांनाही हिंदुस्थानात परत येऊ देत नाही आहे. हिंदुस्थानच्या इमिग्रेशन काउंटरवरील इमिग्रेशन अधिकारी पाकिस्तान दरवाजे उघडण्याची वाट पाहत आहेत.
अटारी सीमेवर आलेले पाकिस्तानी नागरिक सकाळपासून त्यांच्या वाहनांमध्ये गेट उघडण्याची वाट पाहत बसले आहेत. पाकिस्तानकडून गेट उघडल्यानंतर बीएसएफ आधी कागदपत्रे तपासेल, त्यानंतर पाकिस्तानी लोकांना सीमा ओलांडण्याची परवानगी देईल.
हिंदुस्थानी सरकारने 1 मे रोजी अटारी आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याचा निर्णय घेत पाकिस्तानच्या नागरिकांना मोठा दिलासा दिला. 1 मे रोजी अटारी आंतरराष्ट्रीय सीमेवर सर्व हालचाली थांबवण्याचा आणि व्यापार पूर्णपणे बंद करण्याचा आदेश असूनही, पाकिस्तानी नागरिकांना सीमा ओलांडण्याची परवानगी असेल, असे गृह विभागाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. पुढील आदेश येईपर्यंत भारतात असलेले पाकिस्तानी नागरिक अटारी सीमेवरून त्यांच्या देशात परतू शकतात, असे हिंदुस्थानने म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List