पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी तीन ठिकाणी केली होती रेकी, धक्कादायक माहिती आली समोर
पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी तीन ठिकाणी रेकी केली होती. पण सुरक्षा जास्त असल्याने दहशतवाद्यांनी या ठिकाणी हल्ला नाही केला अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पहलगाममध्ये 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. त्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याच्या एक आठवड्यापूर्वी म्हणजेच 15 एप्रिलला या दहशतवाद्यांनी तीन ठिकाणी रेकी केली होती. एका दहशतवाद्याने पहलगामच्याच अम्युसमेंट पार्काचीही रेकी केली होती. पण इथे कडक सुरक्षा होती, त्यामुळे इथे हल्ला करण्याचा निर्णय त्यांनी बारगळला.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी अल्ट्रा स्टेट कम्युनिकेशन सिस्टमचा पावर केला. सिम कार्ड शिवाय या या सिस्टममधून संपर्क साधता येतो. हमास ज्या पद्धतीने इस्रायलवर हल्ला करतो तसाच प्रकार या जम्मू कश्मीरमध्ये झाल्याचे सांगण्यात येत आहे. दहशतवाद्यांनी हेल्मेट, एनक्रिप्टेड अॅप वापरले होते अशीही प्राथमिक माहिती आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List