भयानक! अडल्ट स्टारने गे जोडप्याचा शिरच्छेद करुन डोके फ्रीजरमध्ये ठेवले, हत्येनंतर क्रुरकर्मा गाणे लावून नाचला
नुकताच लंडनमधील ओल्ड बेली न्यायालयामध्ये एक भयानक गुन्हा उघडकीस आला आहे. लंडनमध्ये एका पोर्नोग्राफिक अभिनेत्यावर एका समलैंगिक जोडप्याच्या भयानक हत्येचा आरोप लावण्यात आलेला आहे. कोलंबियन नागरिक असलेल्या योस्टिन अँड्रेस मोस्केरा याने (35) पॉल लॉन्गवर्थ (71) आणि अल्बर्ट अल्फोन्सो (62) या समलैंगिक जोडप्याचा शिरच्छेद करून त्यांच्या शरीराचे तुकडे केले. याच आरोपाखाली सध्या या पाेर्न स्टारवर खटला सुरू आहे. पोर्न स्टारने जोडप्याचे कापलेले डोके फ्रीजरमध्ये ठेवले होते. तसेच त्यांच्या शरीराचे तुकडे करुन ब्रिस्टलमधील क्लिफ्टन सस्पेंशन ब्रिजजवळ सुटकेसमध्ये भरलेले आढळले होते.
लंडनमधील ओल्ड बेली न्यायालयात झालेल्या खटल्यादरम्यान भयानक प्रकरण समोर आले आहे. सरकारी वकील डियाना हीर केसी यांनी खुलासा केला की, लॉंगवर्थ यांच्या डोक्याच्या मागच्या बाजूला हातोड्याने वार करण्यात आला होता. यामुळे त्यांच्या कवटीला फ्रॅक्चर झाले. तर अल्फोन्सो यांच्या चेहऱ्यावर आणि शरीरावरही अनेक वार करण्यात आले होते. सरकारी वकिलांनी केलेल्या दाव्यानुसार, योस्टिन अँड्रेस मोस्केराने 8 जुलै 2024 रोजी जोडप्याच्या बुश अपार्टमेंटमध्ये हत्या केल्यानंतर गाणे लावून नाचलाही होता.
सदर प्रकरणामध्ये योस्टिन अँड्रेस मोस्केराने मृत जोडप्याचे आर्थिक शोषण करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर त्याच्या स्वतःच्या ऑनलाइन खात्यात $5,000 पेक्षा जास्त हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असून, त्यांच्या आर्थिक तपशीलांसह एक पॉवरपॉइंट दस्तऐवज तयार केल्याचा आरोप आहे. व्यवहार ब्लॉक होण्यापूर्वी त्याने एटीएममधून $1,000 पेक्षा जास्त रोख रक्कम देखील काढली होती.
योस्टिन अँड्रेस मोस्केरा या ब्रिटिश समलैंगिक जोडप्याला वरचेवर भेटत असे. पाॅल यांच्या समलैंगिक जोडीदारासोबत योस्टिनचे लैंगिक संबंध होते. या लैंगिक संबंधासाठी त्याला भरपाई देखील देण्यात आल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आले आहे. ही भरपाई अनेकदा ऑनलाइन शेअर केली जात होती. तसेच या जोडप्याने त्याच्या मूळ देशात योस्टिन अँड्रेस मोस्केराला भेट दिल्याचेही समजते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List