‘पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना शहीदांचा दर्जा द्यावा, राहुल गांधींची पंतप्रधान मोदींकडे मागणी
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना शहीदांचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. X वर एक पोस्ट करत राहुल गांधी म्हणाले आहेत की, पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे आणि त्यांना शहीदांचा दर्जा देण्याची मागणी करतो. ते म्हणाले की, मी पंतप्रधानांना विनंती करतो की, त्यांनी या दुर्घटनेत जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांच्या भावनांचा आदर करून त्यांना हा सन्मान द्यावा.
दरम्यान, बुधवारी राहुल गांधी यांनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभम द्विवेदीच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी शुभम द्विवेदीच्या कुटुंबीयांनी त्याला शहीदाचा दर्जा द्यावा, अशी मागणी केली असल्याचं राहुल गांधी म्हणाले. ते म्हणाले की, पीडित कुटुंबाने मला पंतप्रधानांपर्यंत त्यांचा संदेश पोहोचवण्यास सांगितले की, आमची मुले शहीद झाली आहेत आणि त्यांचा आदर केला पाहिजे.
पहलगाम हमले में मारे गए लोगों के परिवारों के दुख में, शहीद के दर्जे की उनकी मांग में, मैं साथ खड़ा हूं।
प्रधानमंत्री से आग्रह है कि वो इस त्रासदी में जान गंवाने वालों को यह सम्मान देकर उनके परिवारों की भावना का आदर करें। pic.twitter.com/auMEehEnOO
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 1, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List