डेक्कन, समर्थ पोलिसांचा नागरिकांना सुखद धक्का; गहाळ झालेले 38 मोबाइल मिळवून दिले

डेक्कन, समर्थ पोलिसांचा नागरिकांना सुखद धक्का; गहाळ झालेले 38 मोबाइल मिळवून दिले

नागरिकांचे गहाळ झालेल्या मोबाइल शोधून परत देण्यात डेक्कन, शिवाजीनगर आणि समर्थ पोलिसांना यश आले आहे. डेक्कन पोलिसांनी 26 मोबाईल, तर समर्थ पोलिसांनी 12 मोबाइल परत मिळवून दिले आहेत. पोलिसांच्या कामगिरीमुळे तक्रारदारांना दिलासा मिळाला असून, नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.

डेक्कन भागातून गहाळ झालेल्या मोबाइलची तक्रार करणाऱ्या नागरिकांची माहिती पोलिसांनी संकलित केली. त्याद्वारे पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला असता, संबंधित मोबाईल विविध ठिकाणांसह परराज्यात वापरात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी हे मोबाइल हस्तगत करून ते नागरिकांना परत केले. उपायुक्त ऋषिकेश रावले, एसीपी साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर, पोलीस निरीक्षक प्रसाद राऊत, उमा पालवे यांनी केली.

मोबाइल गहाळ तक्रारीच्या अनुषंगाने समर्थ पोलिसांनीही तपासाला गती दिली होती. त्यानुसार 8 लाख रुपयांचे 12 मोबाईल तक्रारदारांकडे पुन्हा सुपूर्द करण्यात आले आहेत. पोलिसांच्या कामगिरीवर नागरिकांनी समाधान व्यक्त करीत, मोबाइल पुन्हा मिळाल्यामुळे आनंद व्यक्त केला आहे. सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक चेतन मोरे, सुवर्णा जाधव, अविनाश दरवडे, सुनीता खोमणे, अर्जुन कुडाळकर यांनी ही कामगिरी केली आहे. दरम्यान, केंद्र शासनाच्या दूरसंचार विभागाकडून ‘सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटी रजिस्टर’ (सीईआयआर) ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीवर गहाळ मोबाईलची तक्रार नोंदविण्यात आली होती.

इथे करा तक्रार
गहाळ किंवा हरवलेल्या मोबाईलची तक्रार पुणे पोलिसांच्या संकेतस्थळावर (www.punepolice.gov.in) येथे करावी. तक्रार नोंदविताना जवळच्या पोलीस ठाण्याचे नाव नोंदवावे. त्यानंतर जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रारीची प्रत जमा करावी. मोबाईल हरविल्यानंतर तोच मोबाईल क्रमांक वापरावा. नवीन सीमकार्ड सुरू झाल्यानंतर www.ceir.gov.in संकेतस्थळावर नोंद करावी

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

डेंग्यू बरा झाल्यानंतरही शरीरावर करतो असा परिणाम; ही लक्षणे धोकादायक डेंग्यू बरा झाल्यानंतरही शरीरावर करतो असा परिणाम; ही लक्षणे धोकादायक
पावसाळा म्हटलं की आजार हे आलेच त्यात पावसाळ्यात डासांमुळे होणार आजार तर जास्तच जोर धरतात. त्यातील एक आजार म्हणजे डेंग्यू....
चंद्रपूरमध्ये विसर्जन मिरवणुकीत भाजपमधील कलह चव्हाट्यावर, मुनगंटीवार आणि जोरगेवारांचे वेगवेगळे मंडप
Jalna Honor Killing – बदनापूर तालुक्यात दावलवाडीत बापाने लेकीला संपवले, गळफास घेतल्याचा रचला बनाव
Mega Block News – मध्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांची रविवारी तारांबळ उडणार, वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा
Gujarat – पावागडमध्ये मोठी दुर्घटना, मालवाहू रोपवे तुटून 6 जणांचा मृत्यू
Mumbai Accident : लालबागमध्ये पहाटेच्या सुमारास भीषण अपघात; 2 मुलांना चिरडले, चिमुकलीचा मृत्यू
पिंट्या असो की तात्या… थोडं लक्ष द्या… वयानुसार रात्री किती वाजता झोपलं पाहिजे? घ्या जाणून