अमेरिकेत पैसे गुंतवा अन्यथा जबरदस्त टॅरिफ लावू! सेमिकंडक्टर कंपन्यांना ट्रम्प यांची धमकी

अमेरिकेत पैसे गुंतवा अन्यथा  जबरदस्त टॅरिफ लावू! सेमिकंडक्टर कंपन्यांना ट्रम्प यांची धमकी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा टॅरिफ बॉम्ब फोडण्याच्या तयारीत आहेत. यावेळी त्यांच्या निशाण्यावर कोणताही देश नसून सेमिकंडक्टर चिप बनवणाऱ्या कंपन्या आहेत. ट्रम्प यांनी या कंपन्यांना टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे. ज्या कंपन्या अमेरिकेत गुंतवणूक करणार नाही, त्यांच्यावर भारीभक्कम टॅरिफ लावू, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. याची घोषणा लवकरच करू असेही त्यांनी म्हटले आहे.  ज्या कंपन्या अमेरिकेत प्लांट सुरू करतील किंवा तसा विचार करतील, त्यांना नव्या टॅरिफमधून वगळण्यात येईल असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. व्हॉईट हाऊसमधील पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले, ‘आमचे सरकार सेमिपंडक्टर चिपच्या आयातीवर टॅक्स लावायचा विचार करतेय. अमेरिकेत चिप प्लांट सुरू करणार नाहीत, अशा कंपन्यांवर टॅरिफ लागू होईल.’ सेमिपंडक्टर चिपच्या आयातीवर 100 टक्के टॅरिफ लावू, असे म्हटले होते.

lराष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या धमक्यांमुळे मार्पेटमध्ये आधीच उलथापालथ आहे. जगभरात व्यापार युद्ध सुरू आहे. ट्रम्प यांनी टॅरिफचा वापर शस्त्रासारखा केला आहे. टॅरिफ लावून जगभरातील देशांवर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बला कोर्टात आव्हान देण्यात आले आहे. एका फेडरल कोर्टाने टॅरिफला बेकायदेशीर म्हणून घोषित केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईत दहशत माजवण्याचा कट! धमकी देणाऱ्या व्यक्तीला नोएडामध्ये अटक मुंबईत दहशत माजवण्याचा कट! धमकी देणाऱ्या व्यक्तीला नोएडामध्ये अटक
अनंत चतुर्दशीच्या ऐन मोक्यावर शुक्रवारी मुंबई पोलिसांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर धमकीचा संदेश आला होता. यामुळे एकच खळबळ उडाली. या धमकीमुळे मुंबई...
बिहार पाठोपाठ संपूर्ण देशात लागू होणार SIR, दिल्लीत होणार महत्त्वाची बैठक
अ‍ॅपलची हिंदुस्थानात रेकॉर्डब्रेक कमाई, वर्षभरात 75 हजार कोटींचे प्रोडक्टस् विकले
लाल किल्ल्यातून जैन समाजाच्या धार्मिक कार्यक्रमातून सोने आणि हिऱ्यांनी जडलेला कलश चोरीला, शोध सुरू
उत्तर प्रदेशातील संदीप कुमारला अबुधाबीत 35 कोटींची लॉटरी
न्यायालयाने गुगलला ठोठावला 3540 कोटी रुपयांचा दंड
देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या