स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर 16 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; निवडणूक आयोग, महाराष्ट्र सरकारला स्पष्टीकरण द्यावे लागणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर 16 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; निवडणूक आयोग, महाराष्ट्र  सरकारला स्पष्टीकरण द्यावे लागणार

मुंबई-ठाणे महापालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात 16 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. मे महिन्यात न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र सरकारने चार महिन्यांत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक होते. मात्र ती प्रक्रिया अद्याप रखडलेली आहे. त्यामुळे प्रक्रियेच्या रखडपट्टीबाबत आता निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयापुढे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात 6 मे रोजी सुनावणी झाली होती. त्यावेळी प्रभाग रचना तसेच महापालिका, जिल्हा परिषदांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील 27 टक्के ओबीसी आरक्षणाचा पेच सुटला होता. त्या अनुषंगाने न्यायालयाने राज्य निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र सरकारला चार आठवडय़ांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करा आणि संपूर्ण प्रक्रिया चार महिन्यांत पूर्ण करा, असे निर्देश दिले होते. त्यानुसार सप्टेंबर उजाडण्याआधी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित होते. याच पार्श्वभूमीवर येत्या 16 सप्टेंबरला न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या कालमर्यादेच्या आत निवडणुकांची प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र सरकारची होती. प्रसंगी मुदतवाढ मागता येईल, असे सर्वोच्च न्यायालयने स्पष्ट केले होते. मात्र अद्याप मुदतवाढीसाठी अर्ज करण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय आजपर्यंत केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेऊन कालमर्यादा आखून देईल, असे अपेक्षित आहे, असे याचिकाकर्त्यांचे वकील अॅड. देवदत्त पालोदकर यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अंजली कृष्णा यांना धमकी देणाऱ्या अजित पवारांची ‘दादा’गिरी थंड; महिलांबद्दल मनात आदर,सोशल माध्यमावरून सारवासारव अंजली कृष्णा यांना धमकी देणाऱ्या अजित पवारांची ‘दादा’गिरी थंड; महिलांबद्दल मनात आदर,सोशल माध्यमावरून सारवासारव
पोलीस उपाधीक्षक अंजली कृष्णा यांना फोनवरून ‘डायरेक्ट अॅक्शन’ची धमकी देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार पूर्णपणे बॅकफूटवर आले आहेत. धैर्याने आणि प्रामाणिकपणे...
अमेरिकेत पैसे गुंतवा अन्यथा जबरदस्त टॅरिफ लावू! सेमिकंडक्टर कंपन्यांना ट्रम्प यांची धमकी
असं झालं तर… फोनमधून नंबर डिलीट झाले…
युरोपने गुगलला ठोठावला दंड; डोनाल्ड ट्रम्प संतापले, म्हणाले हा तर अमेरिकेवर अन्याय…!
मुंबई-गोवा महामार्गावर हातिवले येथे कार-ट्रक अपघात; एकाचा मृत्यू, पाच जखमी
उल्हासनगरात टीडीआर घोटाळा? पालिका प्रशासनावर ताशेरे, दोषींवर कारवाई करा, मंत्रालयातून खरेदी-विक्रीचे व्यवहार थांबवण्याचे आदेश
ठाण्यात भरवस्तीत कुंटणखाना चालवणाऱ्या अभिनेत्रीला अटक; अन्य दोघींची सुटका