जलतरणपटू ईशान आणेकरची स्फूर्तीदायक कामगिरी, वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्समध्ये हिंदुस्थानसाठी मिळवले यश
13 वर्षांच्या ईशान आणेकरने वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स 2025 मध्ये चमकदार कामगिरी करत आंतरराष्ट्रीय पातळीवर हिंदुस्थानचा झेंडा फडकावला. हिंदुस्थानातील सर्वात लहान वयाचा अवयव प्रत्यारोपण झालेला जलतरणपटू म्हणून त्याने दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकले.
हिरानंदानी फाउंडेशन स्कूलमधील नववीचा विद्यार्थी असलेल्या ईशानचे वयाच्या 10 व्या वर्षी मूत्रपिंडाचे (किडनी) प्रत्यारोपण लिलावती हॉस्पिटल मध्ये केले होते. त्याच्या वडिलांनी अनंत आणेकर यांनी त्याला मूत्रपिंड दान केले. या कठीण प्रसंगावर मात करत ईशानने जलतरणामध्ये आपली आवड आणि जिद्द कायम ठेवली. ड्रेसडनमध्ये त्याने 100 मीटर आणि 200 मीटर फ्रीस्टाईलमध्ये सुवर्णपदक पटकावले, तर 50 मीटर बटरफ्लायमध्ये रौप्य पदक मिळवले. विशेष म्हणजे, त्याचे वडील अनंत आणेकर यांनीही या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यांना डार्ट्स आणि पेताँक (पेटांक) या खेळांमध्ये दोन रौप्य पदके मिळवली. त्यामुळे आणेकर कुटुंबीयांच्या झोळीत एकूण पाच पदके जमा झाली आहेत. या गेम्समध्ये हिंदुस्थानने 16 सुवर्ण, 22 रौप्य आणि 25 कांस्य पदकांसह 63 पदके जिंकण्याचा पराक्रम केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List