धुवाधार पावसाने ठाणे, पालघरकरांना झोडपले; हवामान विभागाचा रेड अलर्ट

धुवाधार पावसाने ठाणे, पालघरकरांना झोडपले; हवामान विभागाचा रेड अलर्ट

शुक्रवारी (05 ऑगस्ट 2025) सकाळपासूनच जोरदार हजेरी लावलेल्या पावसाने सायंकाळनंतर अनेक भागांत रौद्ररूप धारण केले. ठाणे, पालघरकरांना तर अक्षरशः झोडपले असून हवामान खात्याने या दोन्ही जिह्यांना रेड अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन करण्यात आले आहे.

ठाणे जिह्यातील कल्याण, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा या शहरांमध्ये प्रचंड पाऊस पडत आहे. पावसाचे हे थैमान असेच सुरू राहिल्यास पुराचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. त्यातच हवामान विभागाने आज सायंकाळी ठाणे आणि पालघर या दोन जिह्यांसाठी रेड अलर्ट जारी केल्याने ठाणे जिह्यात अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता आहे.

याजिह्यांना यलो अलर्ट 

मुंबई शहर, बीड, धाराशीव, रत्नागिरी, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग या जिह्यांनाही पावसाचा यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व यंत्रणा सतर्क केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ऑडिटरची फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक ऑडिटरची फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक
ऑडिटरची फसवणूकप्रकरणी तिघांना पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. ओवेश शेख, जुनैद अब्दुला शेख, हुसेन शेख अशी त्या तिघांची नावे...
व्यावसायिकाचे पैसे घेऊन पळालेला आणखी एक ताब्यात
हिंदुस्थानी महिलांचा थायफाय विजय, थायलंडची 11-0 ने उडवली धूळधाण
मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी आक्रमक; हिंगोलीत रास्ता रोको, राज्य सरकारने काढलेल्या जीआरची होळी
पुण्यात गँगवॉर; आंदेकर टोळीने घेतला खुनाचा बदला
अतिक्रिकेटचा ताण गोल्फ खेळून दूर करा! युवराजचा अभिषेक आणि शुभमनला सल्ला
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 06 सप्टेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस