टेस्लाला हिंदुस्थानात थंड प्रतिसाद; फक्त 600 बुकिंग

टेस्लाला हिंदुस्थानात थंड  प्रतिसाद; फक्त 600 बुकिंग

इलॉन मस्क यांची जगप्रसिद्ध वाहन कंपनी टेस्लाने मोठा गाजावाजा करत टेस्लाची कार हिंदुस्थानात लाँच केली, परंतु टेस्लाच्या कारला हिंदुस्थानात थंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दीड ते दोन महिन्यांत टेस्लाला केवळ 600 बुकिंग मिळाली आहे. टेस्लाने हिंदुस्थानात टेस्ला मॉडल वाय लाँच केल्यानंतर याची विक्री सुरू केली होती. हिंदुस्थानी बाजारात या कारची सुरुवातीची किंमत 59.89 लाख रुपये एक्स शोरूम आहे. कंपनीने कारची बुकिंग सुरू केली. त्या वेळी कंपनीने म्हटले होते की, हिंदुस्थानात वर्षाला 2500 कारची विक्री केली जाईल, परंतु कारला थंड मागणी आहे.

टेस्लाच्या कारला थंड प्रतिसाद मिळण्यामागे अनेक कारणे सांगितली जात आहेत. मुळात या कारची किंमत अन्य ईव्हीच्या तुलनेत जास्त आहे. अमेरिकेत या कारची किंमत 38 लाख रुपये आहे, परंतु हिंदुस्थानात आयात शुल्क लागल्यामुळे या कारची किंमत 60 लाखांच्या घरात जाते. हिंदुस्थानात अन्य कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार 30 ते 40 लाखांमध्ये मिळताना हिंदुस्थानी ग्राहक कार खरेदीसाठी 60 लाख रुपये मोजायला मागे-पुढे पाहत आहेत. सध्या अमेरिका आणि हिंदुस्थान या दोन देशांतील संबंध बिघडले आहेत. त्यामुळे याचा फटका टेस्ला कारला सोसावा लागत आहे. हिंदुस्थान जगातील तिसरा सर्वात मोठा ऑटोमोबाईल बाजार बनला आहे. या ठिकाणी जगभरातील विविध ऑटो कंपन्या आपल्या कार लाँच करत आहेत. त्याचा सामना टेस्लाला करावा लागणार आहे. हिंदुस्थानात मार्पेट गाजवायचे असेल तर टेस्लाला कारच्या किमतीत कपात करणे किंवा स्वस्तातील कार लाँच कराव्या लागतील तरच अन्य कंपन्यांच्या कारला टेस्ला टक्कर देऊ शकेल.

टेस्लाने मुंबई आणि दिल्ली या दोन शहरांत आपले शोरूम उघडले आहे. कारची बुकिंग करणाऱ्याला दिवाळीआधी डिलिव्हरी मिळेल, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. यासाठी टेस्ला कंपनीने मुंबई, पुणे, दिल्ली आणि गुरुग्राम या शहरातून कारची डिलिव्हरी केली जाणार आहे, असे कंपनीने सांगितले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन येताना तरुणाच्या बाईकला अपघात, एकाचा मृत्यू लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन येताना तरुणाच्या बाईकला अपघात, एकाचा मृत्यू
शुक्रवारी पहाटे पवई येथे बेस्ट बसच्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेला २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तर त्याचा मित्र, जो दुचाकी...
डोनाल्ड ट्रम्प अखेर नरमले; हिंदुस्थान-अमेरिका संबंधांना नवे वळण, सकारात्मक परिणाम दिसण्याची शक्यता…
कुठे आहेत ‘नव्या पुण्याचे शिल्पकार’? टोळीयुद्धावरून रोहित पवार यांचा सवाल
जयपूरमध्ये चार मजली इमारत कोसळली; वडील आणि मुलीचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती
पंजाबमध्ये पुराचे थैमान; 23 जिल्हे पाण्याखाली, लुधियाना ते नूरवालापर्यंत पूरपरिस्थिती
मुंबईत दहशत माजवण्याचा कट! धमकी देणाऱ्या व्यक्तीला नोएडामध्ये अटक
बिहार पाठोपाठ संपूर्ण देशात लागू होणार SIR, दिल्लीत होणार महत्त्वाची बैठक