मुंबई-गोवा महामार्गावर हातिवले येथे कार-ट्रक अपघात; एकाचा मृत्यू, पाच जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर हातिवले येथे कार-ट्रक अपघात; एकाचा मृत्यू, पाच जखमी

मुंबई-गोवा महामार्गांवर हातीवले येथील टोल नाक्यावर उभ्या असलेल्या ट्रकला महेंद्रा मराझो कंपनीच्या गाडीने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये राजेश शेखर नायडू (वय 34 रा. मालाड पश्चिम मुंबई) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कारमधील अन्य पाच जण जखमी झाले आहेत. जखमींवर राजापूर रूग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी कणकवली येथे नेण्यात आले आहे असे राजापूर पोलिसांनी सांगितले.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्रा मराझो गाडी ही मुंबई, मालाड येथून कणकवली, भिरकोन्डकडे येथे नातेवाईकांकडे निघाले होते. महामार्गाने प्रवास करीत असलेल्या या गाडीमध्ये सहा प्रवासी होते. हातीवले येथील टोल नाक्यावर गाडी आली असता तेथुन पुढे उभ्या असलेल्या ट्रकला महेंद्रा मराझो गाडीने मागून जोरात धडक दिली. त्यामध्ये महेंद्रा मराझो गाडीतील राजेश शेखर नायडू यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला. तर, जखमी तृशांत सुरेश शेलार (वय 32 ), कुणाल शिवाजी साळुंखे (वय 39), हर्षदा कुणाल साळुंखे (वय 28 ), प्रीती राजेश नायडू (वय 28 ), श्राकांत नामदेव घाडगे (वय 28) सर्व रा. मालाड पश्चिम मुंबई या सार्‍यांना तातडीने राजापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामध्ये राजेश शेखर नायडू यांचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर, उर्वरीत सर्व जखमींवर राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी कणकवलीला नेण्यात आले.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमित यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपज्योती पाटील, उपनिरीक्षक सुधीर उबाळे, मोबीन शेख व पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी जखमींना सहाकार्य करत वाहतुक सुरळीत केली व पंचनामा केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईत दहशत माजवण्याचा कट! धमकी देणाऱ्या व्यक्तीला नोएडामध्ये अटक मुंबईत दहशत माजवण्याचा कट! धमकी देणाऱ्या व्यक्तीला नोएडामध्ये अटक
अनंत चतुर्दशीच्या ऐन मोक्यावर शुक्रवारी मुंबई पोलिसांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर धमकीचा संदेश आला होता. यामुळे एकच खळबळ उडाली. या धमकीमुळे मुंबई...
बिहार पाठोपाठ संपूर्ण देशात लागू होणार SIR, दिल्लीत होणार महत्त्वाची बैठक
अ‍ॅपलची हिंदुस्थानात रेकॉर्डब्रेक कमाई, वर्षभरात 75 हजार कोटींचे प्रोडक्टस् विकले
लाल किल्ल्यातून जैन समाजाच्या धार्मिक कार्यक्रमातून सोने आणि हिऱ्यांनी जडलेला कलश चोरीला, शोध सुरू
उत्तर प्रदेशातील संदीप कुमारला अबुधाबीत 35 कोटींची लॉटरी
न्यायालयाने गुगलला ठोठावला 3540 कोटी रुपयांचा दंड
देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या