आम्ही हिंदुस्थान आणि रशियाला गमावले, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे मोठे विधान
मला वाटते आम्ही हिंदुस्थान आणि रशियाला गमावले आहे. हे दोन्ही देश चीनच्या दिशेने वाटचाल करीत आहेत, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून केले आहे. ट्रम्प प्रशासनाने हिंदुस्थानवर 50 टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतल्यानंतर हिंदुस्थान आणि रशियाची चीनशी वाढलेली जवळीक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चीन दौरा आणि अॅपलची हिंदुस्थानातील गुंतवणूक या घडामोडींचा ट्रम्प यांना धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
तिघांचे संबंध दीर्घकाळ टिकतील, अशी अपेक्षा
अपेक्षा आहे की या तिन्ही देशांचे संबंध अधिक दिर्घकाळ आणि समृद्ध राहातील असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. टथवरील या पोस्टसोबत ट्रम्प यांनी मोदी, पुतिन आणि शी जिनपिंग यांचा फोटोही पोस्ट केला आहे.
रशियाला युद्धासाठी निधी पुरवल्याने नाराजी
रशियाला युव्रेन युद्धासाठी हिंदुस्थान सातत्याने निधी पुरवत असल्यामुळे ट्रम्प आणि त्यांची टीम अतिशय निराश झाल्याची प्रतिक्रिया राष्टीय आर्थिक परिषदेचे संचालक केव्हीन हॅसेट यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. तर ट्रम्प यांच्या विधानाबद्दल विचारले असता त्यांनी लवकरच यातून चांगले काही घडेल अशी अपेक्षा आहे, असे सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List