भिंतीच्या कपाटात सापडल्या बारबाला! मीरा रोडच्या टारझन बारवर धाड

भिंतीच्या कपाटात सापडल्या बारबाला! मीरा रोडच्या टारझन बारवर धाड

मीरा रोडच्या टारझन ऑर्पेस्ट्रा बारवर पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा धाड टाकली आणि ग्राहक व बारबालांची धरपकड केली. या छाप्यात पोलिसांनी झडती घेतली तेव्हा बारमध्ये भिंतीत केलेल्या चोरकपाटात चक्क बारबाला सापडल्या. बारबालांना लपवण्याची आयडिया इतकी भन्नाट होती की, आधी इलेक्ट्रिकचा प्लग बोर्डावर लावून बटन दाबले आणि नंतर भिंतीवर लाथ मारली. त्यानंतरच बारबाला लपवलेल्या कपाटाचा दरवाजा उघडला. हे खुल जा सिम सिम बघून पोलीस चाट पडले. या प्रकरणी 22 जणांना अटक केली असून 12 तरुणांची सुटका करण्यात आली आहे.

मीरा-भाईंदर परिसरात नियम धाब्यावर बसवून मोठय़ा प्रमाणावर ऑर्पेस्ट्रा बारच्या नावाखाली अश्लील नृत्य चालते. गुरुवारी रात्री पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त गणपत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी टारझन बारवर धाड टाकली. त्या वेळी अनेक बारबाला अश्लील नृत्य करीत होत्या. पोलिसांनी टारझन बारचे मालक रमण शेट्टी, सिद्धार्थ शेट्टी, पॅशियर मोहित चौरसिया यांनाही ताब्यात घेतले.

अपुरा उजेड… श्वास घेणेही कठीण

टारझन बारच्या कर्मचाऱयांनी इलेक्ट्रीकचा प्लग लावला आणि बटण दाबले. तसेच जोरात लाथ मारली. दरवाजा उघडताच पोलिसांना धक्काच बसला. भिंतीच्या आतमध्ये पाच तरुणी कपाटात कशाबशा लपून बसल्या होत्या. तिथे अपुरा उजेड होता. तसेच श्वास घेणेही कठीण झाले होते. अशा घुसमटलेल्या अवस्थेत लपलेल्या या मुलींची पोलिसांनी तत्काळ सुटका केली. दरम्यान बारमालकावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ऑडिटरची फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक ऑडिटरची फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक
ऑडिटरची फसवणूकप्रकरणी तिघांना पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. ओवेश शेख, जुनैद अब्दुला शेख, हुसेन शेख अशी त्या तिघांची नावे...
व्यावसायिकाचे पैसे घेऊन पळालेला आणखी एक ताब्यात
हिंदुस्थानी महिलांचा थायफाय विजय, थायलंडची 11-0 ने उडवली धूळधाण
मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी आक्रमक; हिंगोलीत रास्ता रोको, राज्य सरकारने काढलेल्या जीआरची होळी
पुण्यात गँगवॉर; आंदेकर टोळीने घेतला खुनाचा बदला
अतिक्रिकेटचा ताण गोल्फ खेळून दूर करा! युवराजचा अभिषेक आणि शुभमनला सल्ला
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 06 सप्टेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस