पुण्यात गँगवॉर; आंदेकर टोळीने घेतला खुनाचा बदला
गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला शहरात गॅंगवॉरचा भडका उडाला असून, माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला त्याच्या टोळीने खून करूनच घेतला आहे. आंदेकर खुनातील मुख्य आरोपीच्या मुलावर टोळीने 11 गोळ्या झाडून हत्या केली. शुक्रवारी रात्री पावणे आठच्या सुमारास मध्यवस्तीत नाना पेठेत घडली आहे. शहरभर सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असतानाच टोळीने खुनाचा बदला खुनानेच घेतल्याने पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांचे अपयश चव्हाटय़ावर आले आहे.
आयुष गणेश कोमकर (20, रा. नाना पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान गणेश कोमकर हा वर्षापूर्वी माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. तो वनराजच्या बहिणीचा दीर असून, आता टोळीने बहिणीच्या दिराच्या मुलाचाच खून केला आहे. पार्ंकगमध्ये दुचाकी उभी करत असताना आधीच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्याच्या दिशेने गोळीबार केला. 11 गोळ्या झाडून हल्लेखोर पसार झाले. त्यातील 3 गोळ्या आयुषच्या शरीरात घुसल्या. गंभीर जखमी आयुषला नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List