ऑडिटरची फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक
ऑडिटरची फसवणूकप्रकरणी तिघांना पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. ओवेश शेख, जुनैद अब्दुला शेख, हुसेन शेख अशी त्या तिघांची नावे आहेत. त्या तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. तक्रारदार हे अंधेरी येथे राहतात. ते अधिकृत ऑडिटर म्हणून काम करतात. एप्रिल महिन्यात त्यांना एका खासगी कंपनीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडण्यात आले. त्या ग्रुपवर शेअर ट्रेडिंगची माहिती दिली जात होती. गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होईल असे त्यांना सांगण्यात आले. त्यांना चांगला परतावा देऊ अशा भूलथापा मारल्या. विश्वास बसावा म्हणून त्यांना एका पंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र पाठवले. ते प्रमाणपत्र पाहिल्यानंतर त्यांनी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी 47 लाख 72 हजार रुपयांची गुंतवणूक केली. गुंतवणुकीसह परतावा म्हणून 1 कोटी 45 लाख रुपये जमा झाल्याचे दिसले. त्यांनी ती रक्कम ट्रान्सफर करण्याचा निर्णय घेतला. अवघे तीन लाख रुपयेच त्यांच्या खात्यात जमा झाले. उर्वरित रक्कम जमा झाली नव्हती. त्याबाबत त्यांनी पंपनीच्या कस्टमर केअरला पह्न केला तेव्हा त्यांना टॅक्सची रक्कम भरा, त्याशिवाय उर्वरित रक्कम जमा होणार नाही असे त्यांना सांगण्यात आले. त्यांनी याबाबत त्यांच्या मित्रांशी चर्चा केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पश्चिम सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला. तपासादरम्यान पोलिसांनी ओवेश, जुनैद, हुसेनला ताब्यात घेऊन अटक केली. ते तिघे मालाड आणि बांगूर नगर येथील रहिवासी आहेत. त्या तिघांना अटक करून आज न्यायालयात हजर केले होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List