देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या
मोदींवर टीका, गुंथर फेहलिंगरचे एक्स खाते ब्लॉक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा माणूस संबोधणाऱ्या, सोशल मीडियावर खलिस्तानचा नकाशा शेअर करणाऱ्या ऑस्ट्रेलियातील अर्थशास्त्रज्ञ गुंथर फेहलिंगरचे एक्स अकाऊंट हिंदुस्थानात ब्लॉक करण्यात आले आहे.
वर्षातील अखेरचे चंद्रग्रहण उद्या दिसणार
2025 मधील अखेरचे चंद्रग्रहण उद्या, 7 सप्टेंबरला दिसणार आहे. हिंदुस्थानसह जगातील अनेक भागांत हे चंद्रग्रहण पाहता येईल. हे चंद्रग्रहण रात्री 9 वाजून 58 मिनिटाला सुरू होऊन मध्यरात्री 1 वाजून 26 मिनिटांपर्यंत पाहता येईल.
चिनी हॅकर्सने चोरला अमेरिकी डेटा
वर्षभरापासून सुरू असलेल्या तपासानंतर अखेर अमेरिकन अधिकाऱ्यांनी खुलासा केला की, चिनी हॅकर सॉल्ट टायफूनने अमेरिकेतील प्रत्येक नागरिकाचा डेटा चोरला आहे. यामध्ये ट्रम्प, उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स यांचाही समावेश आहे.
डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स नव्हे, डिपार्टमेंट ऑफ वॉर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संरक्षण विभागाचे नामकरण केले आहे. ट्रम्प यांनी डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सचे नाव बदलून आता डिपार्टमेंट ऑफ वॉर करण्याची घोषणा केली आहे. नवीन नाव जास्त शक्तिशाली आणि ऐकायला चांगले वाटते, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.
पंजाबच्या पूरग्रस्तांसाठी प्रीती झिंटा सरसावली
पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी बॉलीवूड अभिनेत्री आणि आयपीएलमधील पंजाब किंग्सची मालकीन प्रीती झिंटाने मदतीचा हात पुढे केला आहे. पंजाब किंग्सने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 34 लाख रुपये मदत जाहीर केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List