अॅपलची हिंदुस्थानात रेकॉर्डब्रेक कमाई, वर्षभरात 75 हजार कोटींचे प्रोडक्टस् विकले
आयपह्न बनवणारी कंपनी अॅपलने हिंदुस्थानात रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये अॅपलने 9 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 75 हजार कोटी रुपयांचे प्रोडक्टस् विकले आहेत. हिंदुस्थानात अॅपल प्रोडक्टस्ला चांगली मागणी असून ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, मार्च 2025 पर्यंत 12 महिन्यांत कंपनीच्या विक्रीत जवळपास 13 टक्के वाढ झाली आहे. अॅपलने मागील वर्षीच्या आर्थिक वर्षात 2023-24 मध्ये 8 अब्ज डॉलरची कमाई केली होती. रिपोर्टनुसार, यामध्ये आयपह्नची विक्री सर्वात जास्त राहिली. मॅकबुकच्या विक्रीतही चांगली वाढ झाली आहे. अॅपल प्रोडक्टस्ला हिंदुस्थानात मागणी वाढल्याने कंपनीने हिंदुस्थानात आणखी गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. चीनमध्ये पंज्युमर खर्चात चढ-उतारामुळे अॅपलने आपला फोकस हिंदुस्थानकडे वळवला आहे. त्यामुळेच अॅपलने या आठवडय़ात बंगळुरू आणि पुण्यात दोन नवीन अॅपल स्टोअर उघडले आहेत. तसेच कंपनी आणखी दोन नवीन अॅपल स्टोअर उघडण्याची तयारी करत आहे. अॅपलने 2023 मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय बिझनेस मॅनेजमेंटमध्ये बदल करून हिंदुस्थानातील वेगवेगळे सेल्स विभाग बनवले आहेत. सध्या अॅपलची भागीदारी हिंदुस्थानातील स्मार्टपह्न बाजारात जवळपास 7 टक्के आहे. 2023 मध्ये मुंबई आणि दिल्लीत दोन स्टोअर उघडण्यात आले होते.
आयपह्न 17 ची उत्सुकता
या महिन्यात अॅपल कंपनी आपली नवीन सीरिज आयफोन 17 लाँच करणार आहे. या सीरिजची उत्सुकता आयपह्न चाहत्यांना लागली आहे. या सीरिजमध्ये कंपनी एपूण चार आयफोन लाँच करणार आहे. या फोनच्या किमती किती असतील याकडेही आयफोन चाहत्यांचे लक्ष लागले आहे. आयपह्न या सीरिजमध्ये पहिल्यांदा आयफोन 17 एअर नावाचा एक नवीन स्लिम पह्न बाजारात उतरवणार आहे. पह्नमध्ये अत्याधुनिक फीचर्स मिळणार आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List