लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन येताना तरुणाच्या बाईकला अपघात, एकाचा मृत्यू

लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन येताना तरुणाच्या बाईकला अपघात, एकाचा मृत्यू

शुक्रवारी पहाटे पवई येथे बेस्ट बसच्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेला २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तर त्याचा मित्र, जो दुचाकी चालवत होता, जखमी झाला. हे दोघे लालबागचा राजा मंडळाच्या दर्शनावरून परतत होते. पवई पोलिसांनी बसचालकाविरोधात बेफिकीर व निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा गुन्हा नोंदवला आहे.

बेस्टच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार खड्ड्यामुळे हा अपघात झाला. सकाळी सुमारे 6.55 वाजता मोटारसायकलस्वार स्वप्निल विश्वकर्मा (23) आयआयटी पवईच्या गेटजवळ, पेट्रोल पंपाच्या आसपास असलेला खड्डा चुकवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याचा समतोल बिघडला आणि दोघेही खाली पडले. 

विश्वकर्मा डाव्या बाजूला पडला आणि त्याच्या पायांना गंभीर दुखापत झाली. तर मागे बसलेला देवेश पटेल उजव्या बाजूला पडला आणि बीईएसटी बसच्या मागील चाकाखाली गेला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. विश्वकर्माला बसचालकाने पवईतील खासगी रुग्णालयात दाखल केले,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;