Jalna Honor Killing – बदनापूर तालुक्यात दावलवाडीत बापाने लेकीला संपवले, गळफास घेतल्याचा रचला बनाव

Jalna Honor Killing – बदनापूर तालुक्यात दावलवाडीत बापाने लेकीला संपवले, गळफास घेतल्याचा रचला बनाव

मुलीचे एका मुलासोबत असलेल्या प्रेमप्रकरणामुळे संतापलेल्या बापाने स्वतःच्या मुलीचा गळा दाबून खून केला. खून पचवण्यासाठी तिच्या गळ्याला दोरी बांधून लोखंडी अँगलला लटकवले. पण पोलिसांच्या तपासात बापानेच खून केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी बापाला अटक केली आहे. ही घटना जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील दावलवाडी येथे 5 सप्टेंबर रोजी उघडकीस आली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Chhatrapati sambhaji nagar – तब्बल दहा लाख हुंड्याची मागणी; फौजदारावर गुन्हा

बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष कुकलारे हे रात्रीच्या गस्तीवर असताना त्यांना माहिती मिळाली की, दावलवाडी गावांमधील हरी बाबुराव जोगदंड यांच्या मुलीने गळफास घेतला आहे. माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक संतोष कुकलारे हे पोलीस स्टाफ सह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सदर मुलीने आत्महत्या केली नसून काहीतरी घातपात झाला आहे, असे त्यांना दिसून आले. यावरून पोलीस निरीक्षक एम. टी. सुरवसे यांनी तत्काळ सूत्र हाती घेऊन खोलात जाऊन तपास केला. मुलीचे वडिलांच्या इच्छे विरुद्ध एका मुलासोबत प्रेमप्रकरण असल्याने त्याचा अपमान सर्व समाजात झाला. यामुळे बापानेच स्वतःच्या मुलीचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच खून पचविण्यासाठी मुलीच्या गळ्याला दोरी बांधून लोखंडी अँगलला लटकवले होते.

Nanded News – मुलांची बनावट कागदपत्रे बनवून शासकीय योजनेचा लाभ घेतला; शासनाची 45 हजारांची फसवणूक

मुलीचा मृतदेह बदनापूर ग्रामीण रुग्णालय येथे घेऊन जाऊन त्याची शवविच्छेदन केले. त्यामध्ये मुलीचा गळा दाबून खून केल्याचे दिसून आले. पोलीस निरीक्षक सुरवसे यानी प्राथमिक चौकशी केली.मृत मुलीचे वडील हरी बाबुराव जोगदंड यांनी मुलीच्या प्रेम प्रकरणातून तिचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आणि बदनापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक करेवार हया करत आहेत.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयूष नोपानी याचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एम. टी. सुरवसे, सहायक पोलीस निरीक्षक स्नेहा कारेवांड,सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड, पोलीस उपनिरीक्षक संतोष कुकलारे, पो कॉ. आधार भिसे, पो कॉ. दीपक कराढ,पो कॉ.विकास घाडगे,पो कॉ.पूनंसिंग गोलवाल,पो कॉ. एस. जे. तडवी,पो कॉ.पिल्लेवाड,
पो कॉ. सानप यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;