Mega Block News – मध्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांची रविवारी तारांबळ उडणार, वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा
मध्य आणि हार्बर मार्गावरील प्रवशांची रविवारी (07 सप्टेंबर 2025) तारांबळ उडणार आहे. मध्य रेल्वेने मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी उपनगरिय विभागांवर मेगा ब्लॉकची घोषणा केली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवरील माटुंगा – मुलुंड अप व डाउन जलद मार्गावर आणि पनवेल – वाशी अप व डाउन हार्बर मार्गावर ब्लॉक असणार आहे.
माटुंगा – मुलुंड अप व डाउन जलद मार्गावर सकाळी 11.05 वाजल्यापासून दुपारी 03.45 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. मेगा ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.36 वाजल्यापासून दुपारी 03.10 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद गाड्या माटुंगा स्थानकापासून मुलुंड दरम्यान डाउन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील व त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबून या गाड्या त्यांच्या गंतव्यस्थानावर अंदाजे 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. तसेच ठाण्यानंतरच्या जलद गाड्या मुलुंड स्थानकापासून पुन्हा डाउन जलद मार्गावर वळविण्यात येतील. त्याचबरोबर ठाणे येथून सकाळी 11.03 वाजल्यापासून दुपारी 03.38 वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद गाड्या मुलुंड स्थानकापासून माटुंगा दरम्यान अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील व त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबून या गाड्या माटुंगा स्थानकापासून पुन्हा अप जलद मार्गावर वळविण्यात येऊन गंतव्यस्थानावर अंदाजे 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.
पनवेल – वाशी अप व डाउन हार्बर मार्गावर ब्लॉक
पनवेल-वाशी अप व डाउन हार्बर मार्गावर रविवारी सकाळी 11.05 वाजल्यापासून दुपारी 04.05 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. त्यामुळे ब्लॉक कालावधीत पनवेल येथून सकाळी 10.33 वाजल्यापासून दुपारी 03.49 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिसच्या दिशेने धावणाऱ्या गाड्या रद्द राहतील. तसेच छत्रपती शिवाजी महाराजा टर्मिनस येथून सकाळी 09.45 वाजल्यापासून दुपारी 03.12 वाजेपर्यंत पनवेल किंवा बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन मार्गवरी गाड्या रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत पनवेलहून ठाणेच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या सकाळी 11.02 वाजल्यापासून दुपारी 03.53 वाजेपर्यंत बंद असतील. तसेच ठाण्याहून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या सकाळी 10.01 वाजल्यापासून दुपारी 03.20 पर्यंत रद्द राहणार आहेत. याचा परिणाम ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान धावणाऱ्या गाड्यांवर होणार नाही. या मार्गावरील सेवा प्रवशांसाठी उपलब्ध राहील. ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि वाशी दरम्यान विशेष लोकल गाड्या चालविण्यात येतील. तसेच पोर्ट मार्गावरही सेवा उपलब्ध राहील.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List