Gujarat – पावागडमध्ये मोठी दुर्घटना, मालवाहू रोपवे तुटून 6 जणांचा मृत्यू
गुजरातमधील पंचमहल जिल्ह्यातील पावागड शक्तिपीठ येथे मोठी दुर्घटना घडली. आज दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास एका मालवाहू रोपवेचा दोर तुटल्याने 6 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन लिफ्टमन, दोन कामगार आणि इतर दोघांचा समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि मदत आणि बचाव कार्य सुरू केले. दुर्घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. दुर्घटनेची चौकशी करण्यात येत आहे.
जयपूरमध्ये चार मजली इमारत कोसळली; वडील आणि मुलीचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती
पावगढ शक्तीपीठ हे गुजरातमधील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. येथे दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. अपघातानंतर मंदिर परिसर आणि आजूबाजूच्या परिसरात शोक आणि दहशतीचे वातावरण आहे. प्रशासनाने मृतांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. तर, तांत्रिक तपासणीनंतर अपघाताचे खरे कारण समोर येईल, असे सांगितले जात आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List