विसर्जनाला जाताय… हे लक्षात असू द्या!
अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन सोहळा व्यवस्थीत पार पडवा यासाठी पालिक आणि पोलीस दलाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. विसर्जन सोहळ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भाविकांनादेखील दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विनाकारण वाद होईल असे कृत्य करू नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
मुंबईतील विसर्जन मिरवणुकीत मुंबई-ठाणे आणि राज्यभरातील गणेशभक्तांसह मोठय़ा प्रमाणावर पर्यटक हजेरी लावतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रचंड गर्दी उसळण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी मुंबई पोलीस संपूर्ण तयारीनिशी सज्ज झाले आहेत.
हे टाळा
- विनाकारण वाद होईल असे कृत्य करू नका.
- विसर्जनानंतर एकाच ठिकाणी गर्दी करून थांबू नका.
- अफवा पसरवू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका.
पोलिसांकडून गर्दीच्या नियोजनासाठी प्रथमच ‘एआय’चा प्रभावी वापर केला जाणार आहे.
पोलिसांचे गणेशभक्तांना आवाहन
- विसर्जन सोहळा मस्तीत, पण शिस्तीत साजरा करा.
- संशयास्पद काही वाटल्यास तैनात पोलीस किंवा 100/112 क्रमांकावर संपर्क साधा.
- विनाकारण गर्दी करू नका.
- वयोवृद्ध, लहान बालके व महिलांची विशेष काळजी घ्या.
- वेळोवेळी आवश्यकतेनुसार दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करून सहकार्य करा.
‘लालबागचा राजा’च्या विसर्जनसाठी विशेष व्यवस्था
‘लालबागचा राजा’च्या विसर्जनासाठी यंदा विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दरवर्षी विसर्जनासाठी वापरला जाणारा तराफा यंदा वापरला जाणार नसून यंदा ‘मोटराइज्ड’ तराफा वापरला जाणार आहे. हा तराफा गुजरातमधून बनवून घेण्यात आला असून तो 360 अंशांमध्ये फिरतो. तसेच विसर्जनाच्या वेळी या तराफ्याच्या चहूबाजूला असणाऱ्या स्पिंकलर्सच्या माध्यमातून पाण्याचे फवारे उडताना पाहायला मिळणार आहेत.
मूर्ती विसर्जनासाठी पालिकेकडून व्यवस्था
n चौपाटय़ांवर वाहने अडकू नयेत म्हणून 1,175 स्टील प्लेट. n छोटय़ा मूर्ती विसर्जनासाठी – 66 जर्मन तराफे. n 2,178 जीवरक्षक, 56 मोटरबोटी तैनात. n 594 निर्माल्य कलश आणि 307 निर्माल्य वाहने.
नियंत्रण आणि समन्वय
n विभागीय समन्वयासाठी – 245 नियंत्रण कक्ष. n सुरक्षा देखरेखीसाठी – 129 निरीक्षण मनोरे. n विसर्जन स्थळी – 42 व्रेन, 287 स्वागत कक्ष.
नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई
मिरवणुका यशस्वी पार पाडण्यासाठी भाविक व नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. सर्वांनी नियमांचे पालन करावे. दुचाकीवर प्रिंटर सीट, विनाहॅल्मेट, हयगयीने कार चालवण्याचे टाळा. पोलिसांकडून नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
पालिकेची सज्जता
n मूर्ती विसर्जनासाठी 70 नैसर्गिक स्थळे, 290 कृत्रिम तलाव उपलब्ध.
n विसर्जन स्थळ तसेच भाविकांच्या सेवेसाठी दहा हजारांहून अधिकारी व कर्मचारी कार्यरत.
n निर्माल्य कलश, 245 नियंत्रण कक्ष, निरीक्षण मनोरे, विद्युत व्यवस्था, रुग्णवाहिका आदी सुविधा.
n आरोग्य विभागाकडून 236 प्रथमोपचार पेंद्रांसह 115 रुग्णवाहिका तैनात. चौपाटी परिसरात वैद्यकीय कक्ष.
भरती–ओहोटीची वेळ
6 सप्टेंबर
सकाळी 11.09 – 4.20 मीटर भरती
सायंकाळी 5.13 – 1.41 मीटर ओहोटी
रात्री 11.17 – 3.87 मीटर भरती
7 सप्टेंबर
पहाटे 5.06 – 0.69 मीटर ओहोटी
सकाळी 11.40 – 4.42 मीटर भरती
‘मरे’वर दिवसा ब्लॉक, भक्तांचे हाल होणार
मध्य रेल्वेने ऐन अनंत चतुर्दशीच्या दिवशीही कर्जत ते खोपोलीदरम्यान ‘पॉवर ब्लॉक’ जाहीर केला आहे. शनिवारी दुपारी 2.30 ते दुपारी 4.30 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात कर्जत ते खोपोली लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. दुपारी 3.39 वाजता कर्जतहून खोपोली जाणारी लोकल रद्द केली जाणार असून दुपारी 2.55 वाजता खोपोलीहून कर्जत जाणारी लोकल रद्द करण्यात येणार आहे. याचा मध्य रेल्वेच्या संपूर्ण लोकल वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्जत, खोपोली परिसरातील नागरिकांसह मध्य रेल्वेच्या सर्व प्रवाशांमध्ये रेल्वे प्रशासनाविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. रेल्वे सणासुदीत ब्लॉक घेऊन प्रवाशांना वेठीला धरतेय, असा संताप व्यक्त होत आहे.
मत्स्यदंश व सागरी सुरक्षितता
ऑगस्ट-ऑक्टोबरमध्ये ‘ब्लू बटन जेलीफिश’, ‘स्टिंग रे’ यांचा धोका असतो. त्यामुळे गणेशभक्तांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पालिकेने केले आहे. मत्स्यदंश झाल्यास वैद्यकीय कक्ष व 108 रुग्णवाहिका उपलब्ध ठेवली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List