जर तुमची झोप पण वारंवार मोडत असेल, तर बेडरूममध्ये करा हे 7 बदल; आठवडाभरातच जाणवेल फरक
झोप आपल्या सर्वांना प्रिय असते. ती जर पूर्ण झाली तर आपल्या शरीराचा थकवा कमी होण्यास मदत होते. पण काही वेळेला काहीजणांची झोप ही वारंवार खंडित होते. म्हणजे गाढ झोप लागलेली अताना देखील मध्ये मध्ये सारखी जाग येते. त्यामुळे झोप अर्धवट राहते आणि थकवा जाण्याऐवजी जास्तच थकल्यासारखं वाटतं. त्यासाठी बेडरुममध्ये किंवा तुम्ही झोपत असेलल्या ठिकाणी काही बदल केले तर मात्र नक्कीच याचा फायदा होईल.
चांगल्या झोपेसाठी तुमच्या रूममधील काही गोष्टी बदला जसं की,
बेडची दिशा
चांगल्या झोपेसाठी, अनेक गोष्टी योग्य ठिकाणी असणे खूप महत्वाचे आहे. यापैकी एक म्हणजे तुमच्या पलंगाची दिशा. तुमचा पलंग नेहमी दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असावा. तुम्ही तो नैऋत्येला देखील ठेवू शकता. झोपतानाही तुमचे डोके याच दिशेने ठेवण्याचा प्रयत्न करा.
बेडशीटचा रंग
चांगल्या झोपेसाठी, बेडरुमचा रंग योग्य पद्धतीने निवडणे महत्वाचे असते. खोलीत नेहमी हलक्या रंगाचे बेडशीट वापरण्याचा प्रयत्न करा. यामुळे मन शांत राहते. ज्या बेडशीटवर अनेक डिझाइन्स आहे अशी बेडशीट खरेदी करू नका.
सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद करा
झोपण्यापूर्वी ज्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची गरज नाही ते बंद करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही लॅपटॉपसह अनेक गोष्टी बंद करू शकता. शक्य असल्यास, तुमचा फोन बाजूला ठेवा किंवा झोपण्यापूर्वी तो बंद करा. जर तुम्हाला त्याची जास्त गरज असेल तर तुम्ही तुमचा फोन व्हायब्रेशन मोडवर ठेवू शकता.
कमी आवाजात संगीत ऐका
संगीत केवळ ताण कमी करत नाही तर चांगली झोप घेण्यासाठी देखील खूप उपयुक्त ठरते. तुम्ही YouTube वर किंवा कोणत्याही गाण्याच्या अॅपवर असे संगीत ऐकू शकता जे तुम्हाला निसर्गाच्या जवळचा अनुभव देईल. संगीताचा वेग कमी ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही ते ऐकताच गाढ झोपेत जाल.
बेडखाली काहीही ठेवू नका.
बेडखाली कोणत्याही वस्तू ठेवू नका. सहसा असे केल्याने घरात वास्तुदोष निर्माण होतात. तसेच, तुमच्या खोलीत नकारात्मक ऊर्जा राहू. त्यामुळे देखील झोप वारंवार मोडू शकते.
दारासमोर कधीही झोपू नका.
बऱ्याचदा लोकांचा पलंग दारासमोर असतो. तुमचे पाय आणि डोके दरवाजाच्या समोरच्याच दिशेने असतील तर मात्र तुमची झोप बिघडतेच पण सोबतच तुमच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.
टीव्ही आणि आरसा झाकण्याचे फायदे
जर तुम्हाला झोप येत नसेल तर आजपासून झोपण्यापूर्वी तुमच्या खोलीतील आरसा आणि टीव्ही झाकून टाकायला शिका. वास्तूशास्त्रानुसार झोपताना किंवा जागे होताना आरशात स्वतःला पाहणे योग्य मानले जात नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List