‘लाडकी बहीण’ योजनेत लुटालूट! 14 हजार पुरुषांनी सरकारला गंडवलं; अजित पवार म्हणाले, वसूल करणार
निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन मिंधे सरकारने लागू केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेमध्ये नवा घोळ समोर आला आहे. याआधी सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ उठवला होता. आता चक्क पुरुषांनीही योजनेचे पैसे उकळल्याचे उघडकीस आले आहे. दहा महिन्यांत सरकारने तब्बल 14,298 पुरुषांना ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे वाटले. ‘लाडकी बहीण’चे पैसे लाटणारे ते पुरुष आता कारवाईच्या कचाट्यात सापडले आहेत. सरकार त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे समजते. मात्र योजनेचा लाभ देण्यापूर्वी काटेकोर पडताळणी का केली नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
मिंधे सरकारने ऑगस्ट 2024 मध्ये लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा 14, 298 पुरुषांनी लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती योजनेच्या लाभार्थींच्या छाननीत समोर आली आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीत उपलब्ध डेटाच्या पडताळणीत आणखी काही गंभीर बाबी उघडकीस आल्या आहेत.
दरम्यान, ज्या पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांच्याकडून पैसे वसूल करणार असल्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. गरीब महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. ही योजना पुरुषांसाठी नव्हती, त्यामुळे त्यांच्याकडून आम्ही पैसे वसूल करू. जर त्यांनी सहकार्य केले नाही तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करू, असा इशारा अजित पवार यांनी दिला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List