मुंबई विमानतळ आणि CSMT स्थानकाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी, अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल

मुंबई विमानतळ आणि CSMT स्थानकाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी, अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. मुंबई पोलीस, बॉम्बशोध पथक आणि अन्य सुरक्षा एजन्सींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. तपासादरम्यान दोन्ही ठिकाणी कोणत्याही संशयास्पद वस्तू आढळल्या नाहीत. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करत आरोपींचा शोद सुरू केला आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी लागोपाठ तीन कॉल आले. अज्ञाताने विमानतळावर बॉम्ब ठेवला आहे, थोड्याच वेळात मोठा स्फोट होणार असे फोनवर सांगितले. या फोननंतर विमानतळावर एकच धावपळ उडाली. यानंतर तात्काळ सुरक्षा यंत्रणांना याबाबत माहिती देण्यात आली. अनेक तास विमानतळावर तपास मोहिम राबवण्यात आली. मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.

यानंतर शनिवारी सकाळी महाराष्ट्र पोलिस महासंचालक कार्यालयात अज्ञात व्यक्तीने फोन करून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. यानंतर सुरक्षा यंत्रणांना अलर्ट करण्यात आले. मुंबई पोलीस, रेल्वे पोलीस, बॉम्बशोधक पथकाने सीएसएमटी स्थानकात दाखल होत शोध मोहिम सुरू केली.

सुमारे दोन तास स्थानकात शोधमोहिम राबवण्यात आली. मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. अज्ञाताविरोधात कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी स्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली असून सीसीटीव्ही निरीक्षण देखील वाढवले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चवीला गोड, तरीही मधुमेहाचे रुग्ण खाऊ शकतात ‘ही’ 4 फळे, रक्तातील साखर राहील नियंत्रणात चवीला गोड, तरीही मधुमेहाचे रुग्ण खाऊ शकतात ‘ही’ 4 फळे, रक्तातील साखर राहील नियंत्रणात
आजच्या धावपळीच्या जीवनात तसेच बदलत्या जीवनशैलीत लोकं त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेऊ शकत नाहीत. त्यामुळे वाढत्या वजनाच्या समस्येसोबतच हृदयरोग आणि...
दातांचं आरोग्य वाचवायचंय? मग गोड पेयांबाबत घ्या ‘ही’ खबरदारी
फायबरच्या कमतरतेमुळे आतड्यांना निर्माण होऊ शकतो धोका, ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
Haircare Tips: आठवड्यातून किती दिवसांनी केस धुवावेत? जाणून घ्या स्कॅल्पशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, सुरक्षा दलाच्या गोळीबारात चार नक्षलवादी ठार
घरातल्या या गोष्टींमुळे होऊ शकतो कॅन्सर, जाणून घ्या सविस्तर…
मिंधे-भाजप मंत्र्यांमध्ये ‘पत्रयुद्ध’; मिंध्यांनो लक्षात ठेवा गाठ कुणाशी आहे