मंत्रीपद जाण्याची भीती; रमीपटू माणिकराव कोकाटे शनिदेवाच्या चरणी
वदग्रस्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटे राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. वादग्रस्त वक्तव्य आणि विधानसभेत मोबाईलवर रमी खेळताना दिसून आल्याने कोकाटेचे मंत्रीपद धोक्यात आले आहे. वादाच्या भोवऱ्यात पुरते अडकलेल्या कोकाटेंनी शनिदेवाच्या चरणी धाव घेतली.
कृषिमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. या पार्श्वभूमीवर नंदुरबारमध्ये शनि देवाचे साडेसाती मुक्त स्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शनिमांडळ येथील शनि मंदिरात कोकाटेंनी दर्शन घेऊन पूजा केली. यासंदर्भातील काही फोटो व्हिडीओ समोर आले आहेत.
शेतकरी बांधवांविरोधात केलेली बेताल वक्यव्य आणि विधिमंडळात रमी खेळतानाचा त्यांचा व्हायरल व्हिडीओ असेल, यामुळे ते विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. हा विषय आता तापला असून विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या संदर्भात मंगळवारी महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लवकरच कोकाटेंच्या राजीनाम्याचा निर्णय स्पष्ट होईल.
इजा, बिजा आणि आता तिजाही झाले! कोकाटेंचा सोमवारी फैसला अजितदादांनी भेटायला बोलावले
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List