जलजीवनच्या कामासाठी फोडलेल्या रस्त्याची दुरुस्तीच केली नाही, अंत्ययात्रेसाठी चिखल तुडवत घेऊन जावा लागला मृतदेह
अहमदपूर तालूक्यातील मौजे हडोळती येथे मागील वर्षी जनजीवन पाणीपुरवठा योजनेसाठी चांगला रस्ता उखडून टाकण्यात आला. वारंवार मागणी करूनही रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. स्मशानभूमीकडे, शाळा , महाविद्यालयाकडे जाण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे. काल दि. 25 रोजी अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत कसे जायचे सांगा असे म्हणत नागरिकांनी सरपंच पुत्रास घेराव घातला होता. या चिखलमय रस्त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
शिरूर ताजबंद ते मुदखेड जाणाऱ्या राज्य मार्गाला जोडणारा आनंदवाडी व हडोळती येथील झोपडपट्टी कडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे. मागील वर्षी जलजीवन पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी हा चांगला रस्ता फोडण्यात आला. फोडलेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. रस्ता उखडल्यामुळे या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. नागरीक, शालेय विद्यार्थी ,वाहन चालक, वयस्क नागरीकांना रस्त्यावरून चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. थोडा जरी पाऊस झाला तरी अनेक किरकोळ अपघात होत आहेत. त्यामुळे बऱ्याच जणांना किरकोळ मार लागून जखमी झाल्याच्या घटना घडत आहेत . रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतला अनेकदा कळवण्यात आले. ग्रामपंचायत मुरूम टाकून देते परंतु त्यामुळे चिखलाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. रस्ता दुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर झाला असून त्याचा नारळ देखील फोडला आहे परंतु रस्याचे काम बऱ्याच कालावधी पासून रेंगाळले आहे .
या भागात राहणाऱ्या एका मुस्लिम समाजाच्या व्यक्तीचे शुक्रवारी निधन झाले. या रस्त्यावरील चिखलातून अंत्ययात्रा कशी घेऊन जावे हा प्रश्न सर्वांना पडला होता. संतापलेल्या नागरिकांनी थेट हडोळतीच्या सरपंच पुत्राला घेराव घालून रस्त्याचा मागणी साठी जाब विचारला . परंतू त्यांनी हे आमचे काम नाही अशी बघ्याची भुमिका घेतली. अंत्ययांत्रा तशाच चिखलातून काढावी लागली. त्यामुळे या परिसरातील नागरीक आता तीव्र आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत .
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List