शिवसेनेच्या अरविंद सांवत यांच्यासह महाराष्ट्रातील 7 खासदारांना ‘संसदरत्न’ जाहीर
देशातील 17 खासदारांना यंदाचा ‘संसदरत्न पुरस्कार 2025’ जाहीर करण्यात आला आहे. यंदा ‘संसदरत्न’ पुरस्कारांसाठी महाराष्ट्राने बाजी मारली असून महाराष्ट्रातील 7 खासदारांनी या यादीत स्थान पटकावले आहे. संसदेमध्ये उल्लेखनीय, सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी करणार्या खासदारांना दरवर्षी ‘प्राईम पॉईंट फाऊंडेशन’ या संस्थेमार्फत हा पुरस्कार दिला जातो.
या संसदरत्न पुरस्कारात महाराष्ट्रातील शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) अरविंद सावंत, सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), आणि वर्षा गायकवाड (काँग्रेस) यांच्यासह राज्यातील सात खासदारांचा संसदेत उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘संसदरत्न’ पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List