तुम्ही पण बाळाच्या पायात काळा धागा बांधता? थांबा चूक करताय, बाळाला होऊ शकतो हा धोका
आपण शक्यतो सगळ्याच्या घरात हे पाहिलं असेल की मोठी माणसं वाईट नजरेपासून रक्षण करण्यासाठी आपल्या आपल्या बाळाच्या पायाता काळा धागा बांधतात. किंवा काळा धागा बांधण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्हीही तुमच्या बाळाच्या हाताला किंवा पायाला धागा बांधला असेल तर जरा थांबा आणि याबाबत तज्ज्ञांनी याबाबत काय सांगितलं आहे ते पाहुयात.
तुम्हीही तुमच्या बाळाच्या पायात किंवा हातात काळा धागा बांधता का?
घरात मूल जन्माला येताच सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. संपूर्ण कुटुंब मुलाची काळजी घेण्यात रात्र-दिवस प्रयत्न करत असतात. प्रत्येकजण आपल्या बाळाला निरोगी ठेवायचं असतं, सर्व प्रकारच्या त्रासांपासून दूर ठेवायचं असतं. अशा परिस्थितीत, लहान मुलांना वाईट नजर लागू नये किंवा कोणत्याही नकारात्मक उर्जेचा त्याच्यावर परिणाम होऊ नये यासाठी पायात काळा धागा बांधला जातो. जर तुम्ही तुमच्या मुलाला वाईट नजरेपासून दूर ठेवण्यासाठी काळा धागा बांधला असाल तर तुम्ही डॉक्टर काय सांगितात हे लक्षात घेतलं पाहिजे. बालरोगतज्ज्ञ इम्रान पटेल यांनी एका मुलाखतीत याबद्दल सांगितले आहे.
बाळाला काळा धागा बांधण्याबद्दल डॉक्टर काय म्हणतात?
मुलाखतीत डॉ. इम्रान पटेल यांनी सांगितलं की, बहुतेक पालक मुलाच्या हातावर, पायावर आणि कंबरेवर काळा धागा बांधतात, परंतु असे करू नये. कारण कधीकधी तो धागा घट्ट होतो ज्यामुळे मुलाची नस दबली जाऊ शकते. तो धागा कधीकधी इतका घट्ट असतो की त्यामुळे मुलाची त्वचा कापू शकते. कारण लहान बाळाची त्वचा ही अतिशय नाजूक असते. कधीकधी अशा प्रकरणांमध्ये शस्त्रक्रिया देखील करावी लागते.
हात किंवा बोट काळे होऊ शकतात
या मुलाखतीत डॉक्टरांनी एका घटनेबद्दलही सांगितले, की “एका लहान मुलाचा हात धाग्याने कापला गेला होता त्यामुळे त्या बाळाला संसर्गही झाला होता. जेव्हा वास आला तेव्हा पालकांना कळले. डॉक्टर म्हणाले की घट्ट धाग्यामुळे रक्त प्रवाह थांबू शकतो, ज्यामुळे गॅंग्रीन होऊ शकते. यामुळे हात किंवा बोट काळे होऊ शकते आणि कधीकधी हे प्रकरण कापण्याच्या टप्प्यावर येतं. .
डॉक्टरांनी सुरक्षित पर्याय सांगितला
डॉक्टर म्हणतात की बहुतेक लोक त्यांच्या मुलांना वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी काळा धागा घालतात. जर तुम्हीही या कारणासाठी त्यांना धागा घालत असाल तर धाग्याऐवजी त्यांना एक मऊ ब्रेसलेट घाला जो सैल असेल. जर तुम्हाला धागा बांधायचाच असेल तर तो दर आठवड्याला बदलत रहा. यासोबतच, मानेवर किंवा हातावर न बांधता पायावर धागा बांधा. आणि तोही सैल बांधा. पायातून तो नीट फिरतोय ना हे पाहा. जेणे करून बाळाला कोणताही धोका होणार नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List