महाडजवळ खासगी बस उलटली; 11 जण जखमी
महाडच्या घरोशीवाडीजवळ आज दुपारी भीषण अपघात झाला. रायगड किल्ला बघितल्यानंतर मुंबईला जात असताना खासगी बस निसरड्या रस्त्यावरून घसरली आणि पलटी झाली. या अपघातात 11 जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर पाचाड आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व प्रवाशांना बाहेर काढले. दैव बलवत्तर म्हणूनच आपला जीव वाचला, अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली.
पुणे येथील 32 शिवभक्त रायगड किल्ला पाहण्यासाठी गेले होते. खाली उतरल्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास खासगी बसमधून सर्व जण पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाले. पावसामुळे रस्ता निसरडा झाला होता. ही बस घरोशीवाडी येथे आली असता बसचालकाचा ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. या अपघातात 11 प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच महाड तालुका पोलीस आणि पाचाड पोस्ट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
डहाणूत एक ठार
डहाणू – रस्त्यावरील चिखलाच्या राडारोड्यामुळे इको कार झाडाला धडकून भीषण अपघात झाल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा आंबिवली सोमनपाडा परिसरात घडली. या अपघातात एक तरुणी जागीच ठार झाली असून सहा तरुणी जखमी झाल्या आहेत. या सातही तरुणी मजूर असून अंजली काकरा (23) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. निकणे येथील सायवन देसक हे आच्छाद गावातून सात मजूर तरुणींना घेऊन त्यांच्या घरी सोडण्यासाठी निघाले. दरम्यान सोमनपाडा कार थेट झाडावर जाऊन धडकली. ग्रामस्थांनी जखमींना कासा उपजिल्हा रुग्णाल यात उपचारासाठी दाखल केले. त्यातील दोघींची प्रकृती स्थिर असून चार गंभीर जखमी तरुणींना पुढील उपचारासाठी वेदांत रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List